Ticker

6/Breaking/ticker-posts

करिना कपूरचे ‘ प्रेग्नेंसी बायबल’ वादग्रस्त 'मी आदर्श आई नाही' पुस्तकातून अनेक धक्कादायक खुलासे

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : अभिनेत्री  करिना कपूर- खानने तिच्या दोन्ही प्रेग्नेंसीमधील अनुभवांवर आधारित प्रेग्नेंसी बायबल हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामुळे करिना खूपच चर्चेत आली आहे. या पुस्तकामधून करिनाने काही गोष्टींचे खुलासे देखील केले आहेत. ' सुरुवातीच्या काळात मी आदर्श आई नव्हते,' असे करिनाने या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच नमूद केले आहे.

या पुस्तकात करिनाने तिच्या पहिल्या बाळाला, तैमूरला सांभाळतानाचे अनुभव लिहिले आहेत. करिनाने लिहिले की बाळाची जबाबदारी पार पाडत असताना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. सगळ्यात मोठ्या अडचणीबद्दल करिनाने पुस्तकात लिहिले आहे की, ‘सुरुवातीला तर मला तैमूरला डायपर कसे घालायचे हेदेखील माहीत नव्हते. बऱ्याच वेळा तो शू करायचा आणि सगळे कपडे ओले होऊन जायचे. कारण डायपर नीट घातलेला नसायचा.'

करिनाने सर्व नवोदित मातांसाठी एक सल्ला दिला आहे. ती सांगते तुमच्यासाठी जी गोष्ट सोपी असेल आणि जी तुम्ही आरामात करू शकता ती करा. जेव्हा आईमध्ये आत्मविश्वास येईल तेव्हा ती आरामात काम आणि बाळाचे संगोपन करू शकते. ही गोष्ट मी देखील केली होती. त्यामुळेच मी बाळंतपणानंतर लवकर काम सुरू करू शकले.'

करिना पुढे सांगते की, तिला माहिती होते की तिची ओळख ही केवळ आईपुरतीय मर्यादीत नाही. त्यामुळेच तिने प्रेग्नेंसीवेळी देखील काम केले होते. तैमूरच्या जन्मानंतरही तिने लवकरच कामाला सुरुवात केली होती. अर्थात लहानग्या तैमूरला घरी सोडून जाणे तिच्यासाठी सोपे नव्हते. हा अनुभव सांगताना करिनाने लिहिले आहे, 'मला आठवते तैमूरला सोडून मी रात्रीच्यावेळी चित्रीकरणाला गेले होते. त्यावेळी मला तैमूरची खूप आठवण येत होती. परंतु त्या ठिकाणी मला प्रोफेशनली वागावेच लागले. जेहचा जन्म झाल्यानंतर देखील मी लवकरच काम करायला सुरुवात केली. दोन्ही बाळंतपणानंतर मी लगेचच कामाला सुरुवात केली. त्यामुळे तैमूरचे माझ्यावरील प्रेम कमी झालेले नाही. मला विश्वास आहे की जेहच्याबाबतीतही तसेच होईल. मी आई देखील आहे आणि काम करून स्वतःला सिद्ध देखील करणार आहे.'

करिनाच्या करीअरबद्दल सांगायचे तर 'अंग्रेजी मीडियम' सिनेमात ती दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत इमरान खान आणि राधिका मदन देखील होते. आता करिना 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती आमिर खान सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी करिना गरोदर होती. चित्रीकरणावेळी तिचे बेबी बंप दिसत होते. मात्र निर्मात्यांनी व्हीएफएक्सद्वारे करिनाचे बेबी बंप लपवले होते.

दरम्यान, करिनाने लिहिलेल्या या पुस्तकाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाच्या नावामध्ये बायबल हा शब्द असल्याने ख्रिस्तीधर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे काही संघटनांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर करिनाच्या आणि पुस्तकाच्या प्रकाशकांविरोधात बीड आणि ठाणे येथील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या