Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसैनिकांना ताकद दिली जाईल- भाऊ कोरगांवकर






नगर येथे शिवसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आलायाप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकरजिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडेमहापौर रोहिणी शेंडगेशहरप्रमुख दिलीप सातपुतेयुवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोडमाजी महापौर भगवान फुलसौंदरअभिषेक कळमकरमाजी शहरप्रमुख संभाजी कदममाजी उपमहापौर अनिल बोरुडेसंजय शेंडगेबाळासाहेब बोराटेगणेश कवडेसचिन शिंदेश्याम नळकांडेदत्ता जाधवसंतोष गेनप्पाविजय पठारेअमोल येवलेसंग्राम शेळकेसंग्राम कोतकरबबलू शिंदे आदि. (छाया : राजु खरपुडे)

 नगरमधील शिवसंपर्क अभियानाचा समारोप

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अ. नगर : शिवसेनेेने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षमय भुमिका घेतलेली आहेतळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविले जावेत्यांना न्याय मिळवा यासाठी शिवसैनिक प्रयत्नशिल असतातनागरिकांचे प्रश्न सुटत असल्याने तेही शिवसेनेशी जोडले जात आहेतशिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात शिवसैनिकांचे मोठे परिश्रम आहेतआज राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहेनगरमध्येही आता शिवसेनेच्या महापौर आहेत.  त्यामुळे शिवसैनिकांनी या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊन जनतेची सेवा करावीराज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावात्याचबरोबर संघटनही वाढवावेजुन्या-नव्यांचे मेळ घालून नगर जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्क अभियान राबविण्यात आलेत्यास उत्फुर्त प्रतिसाद लाभलायापुढील काळात राज्यातील मंत्र्यांना नगरमध्ये आणून जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न राहीलपक्ष संघटनेचे काम वाढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुनही ताकद दिली जाईलअसे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी केले.

नगर येथे शिवसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आलायाप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकरजिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडेमहापौर रोहिणी शेंडगेशहरप्रमुख दिलीप सातपुतेयुवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोडमाजी महापौर भगवान फुलसौंदरअभिषेक कळमकरमाजी शहरप्रमुख संभाजी कदममाजी उपमहापौर अनिल बोरुडेसंजय शेंडगेबाळासाहेब बोराटेगणेश कवडेसचिन शिंदेश्याम नळकांडेदत्ता जाधवसंतोष गेनप्पाविजय पठारेअमोल येवलेसंग्राम शेळकेसंग्राम कोतकरबबलू शिंदे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे म्हणालेशिवसंपर्क अभियानाचा आज समारोप होत असला तरी शिवसैनिकांनी कायम नागरिक व पक्षाच्या पदाधिकार्यांशी संपर्कात राहिले पाहिजेनगर शहर हे सेनेचा बालेकिल्ला असल्याने हे मजबूत संघटन आणखी मजबूत करावेअसे आवाहन केले.

प्रास्तविकात शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणालेनगर शहरात शिवसेनेने आपल्या कामाने वेगळे स्थान निर्माण केले आहे.   नागरिकांचे प्रश्नांसाठी आपण सदैव तत्पर राहिले पाहिजेहीच शिकवण स्व.अनिल राठोड यांनी दिली आहेआज महापौरपद शिवसेनेकडे असल्याने त्या माध्यमातून आपआपल्या भागातील प्रश्न सोडवावेत्याच बरोबरच संघटना वाढीसाठीही प्रयत्न करावेतनगर शहरात  पुढील काळात शिवसेनेच्या 70 ते 80 शाखा स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केलाकोरोनामुळे विस्कटलेली घडी व्यवस्थीत बसविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावेअसे आवाहन करुन संघटनेचा आढावा सादर केला.

याप्रसंगी विक्रम राठोड म्हणालेयुवक - विद्यार्थ्यांचे प्रश्न आक्रमकपणे सोडविल्याने युवकांमध्ये शिवसेनेबद्दल मोठे आकर्षक आहेया युवकांना योग्य दिशा देण्याचे काम युवा सेनेचे पदाधिकारी करत आहेतशिक्षण व नोकरी आदिंसह विविध उपक्रमातून शिवसेनेचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.

याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगेमाजी महापौर भगवान फुलसौंदरबाळासाहेब बोराटेसंदेश कार्ले आदिंनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी जि..सदस्य शरद झोडगेसंदेश कार्लेगोविंद मोकाटेराजेंद्र भगतजिल्हा संघटक स्मिता अष्टेकरनिर्मला धुपधरेकांता बोठेशशिकांत देशमुखपारुनाथ ढोकळेअंबादास शिंदेअशोक दहिफळेदिपक कावळेमुन्ना भिंगारदिवे आदिंसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार अभिषेक कळमकर यांनी मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या