Ticker

6/Breaking/ticker-posts

'' मी सेवानिवृत्त झाली नसून,दुसरी इंनिग सुरू झाली ''.. माजी महिला व बालकल्याण अधिकारी सरस्वती बागुल
लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

अहमदनगर : येथील सीएसआरडी च्या माजी विद्यार्थिनी व शब्दगंधच्या सदस्या सरस्वती बागुल या ठाणे येथून महिला व बालकल्याण अधिकारी म्हणून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी समाजकल्याण व आदिवासी कल्याण विभागात मुंबई,ठाणे तर महिला व बाल कल्याण विभागात रत्नागिरी,पुणे,जळगाव,ठाणे येथे सेवा केली.
                                          
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, '' मी सेवानिवृत्त झाली नसून, शासन सेवापूर्ती झाली आहे. सामाजिक सेवेची माझी दुसरी इंनिग सुरू झाली असून समाजकार्यात सर्वांचे सहकार्याची आवश्यकता आहे''  या कार्यक्रमास शहरी व ग्रामीण प्रकल्प आधिकारी तसेच श्रीम. सरस्वती नामदेव बागुल यांचे पती राजेंद्रकुमार भास्कर,सुमेध भास्कर, गुणरत्न भास्कर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी अहमदनगरहून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय आढाव,शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी शुभेच्छा दिल्या.

यासेवापूर्ती कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अतिरिक्त मुख्यसचिव उज्ज्वल उके,उपायुक्त गोकुळ देवरे,राहुल मोरे,महिला व बालविकास विभाग चे बापूराव भावाने,आनंद खंडागळे,नितीन मस्के,महेंद्र गायकवाड,जेष्ठ नेते आण्णासाहेब रोकडे,सहकार निबंधक राहुल भास्कर,प्रताप पाटील,सुवर्णा जाधव,संजय खंडागळे इ.मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या