लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जामखेड
: खासदार प्रीतम मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे
होता, हि
सर्वसामन्य नागरिकांची लोकभावना असल्याचे मत माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले.
जामखेड येथे काल प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा
राम शिंदे व भाजपा चे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांच्या
उपस्थितीत कार्यकर्ता बैठकी नंतर माध्यमांशी बोलत होते.
या
बैठकीस जामखेड तालुकाध्यक्ष अजय काशीद, ओबीसी जिल्हा अध्यक्ष संतोष रायकर , धनंजय बडे प्रभारी, तालुकाध्यक्ष अजय काशीद, खर्डा जिल्हा परिषद सदस्य, सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे , डॉ.भगवान मुरूमकर, सुधीर राळेभात, कांतीलाल खिवसरा,ऍड. प्रवीण सानप, मनोज कुलकर्णी, सोमनाथ राळेभात, नगरसेवक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे ,
नगरसेवक बिबिषन धनवडे,नगरसेवक अमित चिंतामणी ,
युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कारले , सरचिटणीस
लहू शिंदे , , अल्ताफ शेख , प्रवीण
चोरडीया , पांडुरंग उबाळे, बाळासाहेब
गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, उदयसिंह
पवार, काकासाहेब वाळुंजकर, गौतम कोल्हे,
सह कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी
मंत्री शिंदे म्हणाले कि, माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते आशिष शेलार,व पंकजा मुंडे यांनी देखील नाराजी नसल्याचे मत व्यक्त केले आहे. गेल्या
दोन तीन दिवसात भाजपचे पदाधिकारी व मुंडे गटाला मानणारे पदाधिकारी हे सरसकट
राजीनामे देत आहेत. त्यामुळे खासदार प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा हि लोकभावना आहे.
शिंदे
म्हणाले कि, जलसंधारणाच्या चांगल्या कामा मुळे गेल्या २
वर्षात एक हि टँकर कर्जत – जामखेड
ला लागला नाही. त्यामुळे जलसंधारणाच्या कामाचे फलित आहे. जलसंधारण च्या कामाची
चौकशी फक्त कर्जत – जामखेडच्या जलसंधारणच्या कामाची चौकशी
सुरु आहे त्यामुळे किती हि चौकशी करा मी पण कोणत्याही
चौकशीला भीत नाही. शेतकऱ्यासाठी जलसंधारणच्या कामामुळे शेतीचे उत्पादन वाढले,गेल्या दोन वर्षात पाणी टंचाई जाणवली नाही. त्यामुळे जलसंधारण च्या कामे
लोकांसाठी केले आहेत आणि त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना झाला आहे.त्यामुळे आमदार
यांनी दोन वर्षात काय काम केले यावर लक्ष देण्याएवजी सोशल मिडीयावर फोटो टाकायचे
एवढे काम करत आहेत. कर्जत – जामखेडचा विकास हा फक्त सोशल
मिडीयावर सुरु असल्याचा आरोप राम शिंदे
यांनी केला.
यावेळी
१७ जुलै रोजी प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या बैठकीत गाव तेथे विविध
कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम
हाती घेण्याचे आवाहन माजी मंत्री राम शिंदे केले आहे.
0 टिप्पण्या