Ticker

6/Breaking/ticker-posts

स्टेशन रोड परिसरातील कार्यकत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे जीवनमान उंचविले- सुवेंद्र गांधी


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अनेक लाभदायी योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. सर्वसामान्या नागरिकांना सर्व सोयी-सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्याचे काम भाजप प्रणित सरकार करत आहे. सर्वच क्षेत्रातील देशाने आघाडी घेतली आहे. सध्या कोरोना काळातही देशावासियांना मोफत लस उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण केले आहे. त्यामुळे युवकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल होत आहे. या तरुणांना योग्य दिशा देऊन समाजोन्नत्तीचे काम पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केले.

     रेल्वे स्टेशन परिसरातील निलक्रांती मंडळाचे विजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला असता, त्यांचे स्वागत  माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी व युवा वॉरिअर शहर जिल्हाध्यक्ष विशाल खैरे यांनी केले.

     याप्रसंगी विशाल खैरे म्हणाले, स्टेशन रोड परिसरात भाजपचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. भाजपा सरकारच्या योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. त्यामुळे युवकांमध्ये भाजपा पक्षांबद्दल  आकर्षण आहे. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्षाच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

     याप्रसंगी आदेश झेंडे, हिरा पाडळे, मनोज पंचमुख, स्वप्नील माने, विशाल आव्हाड, हमीद शेख, शौकत सय्यद, दिपक साळवे, प्रमोद कानडे, दिपक भालेराव, भारत कदम, विलास घवाळे, संदिप देठे, दिनेश ठोकळ, राहुल पोखरणा, सुरेश देठे, संतोष गिते, बाळासाहेब बोरुडे, सचिन सूर्यवंशी, अतिश पाटोळे, सचिन वाघमारे, धीरज रासकर, सागर पोळ आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या