Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळ: श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारात मृत अवस्थेत आढळले 5 मोर..!


लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात पाच मोर मृत अवस्थेत आढळले आहेत.बर्ड फ्यु च्या पार्श्वभूमीवर परिसरात खळबळ उडाली आहे.

कोकणगाव , आढळगाव परिसरात मोराची संख्या मोठी आहे.अलिकडच्या काळात ओढ्या नाल्यावर अतिक्रमण वाढले. झाडे झुडपे कमी झाली आहेत. त्यामुळे मोरांची वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत कोकणगाव शिवारात पाच मोराचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पिकांवरील विषारी किटक नाशक मुळे कि शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकल्याने झाला की बर्ड फ्लू मुळे झाला. याचा शोध घेणे आवश्यक आहे. वन विभागाचे अधिकारी यांनी मोर मृत्यू प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणे आवश्यक आहे.  त्यामुळे बर्ड फ्यु च्या पार्श्वभूमीवर परिसरात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या