Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार,महापौर,उपमहापौर,मनपा आयुक्त यांची स्वच्छता मोहीम..

 स्वच्छ सुंदर हरित नगरच्या संकल्पनेत नगरकरांनी सामील व्हावे-आ.संग्राम जगताप 

 *छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनपाची स्वच्छता मोहिम सुरु

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर :संत गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे.हातात झाडू घेऊन गावो-गावी व शहरात जाऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्याचे काम केले आहे.केंद्र सरकारने भारत स्वच्छ अभियान राबवुन शहरांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले आहे,याच बरोबर महाराष्ट्र सरकारने माझी वसुंधरा अभियान राबविले आहे.आपल्या महापालिकेने उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून शहरांमध्ये आज पासून महिन्यातून दोनदा स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे.या अभियानामध्ये नागरिकांनी व विविध सामाजिक संस्थांनी तसेच मंडळींनी सहभागी व्हावे जेणेकरून समाजाबद्दल व शहरा बद्दल आपले कर्तव्य पार पाडण्याची संधी मिळेल, स्वच्छतेतून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मदत होते, याच बरोबर शहराच्या सौंदर्य करणार भर पडते असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

अहमदनगर महानगर पालिकेच्या वतीने शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविताना आ.संग्राम जगताप,महापौर रोहिनीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले,आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, दत्ता कावरे,उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त कुरे,शहर अभियंता सुरेश इथापे, घनकचरा विभाग प्रमुख डॉ.शंकर शेडाळे,उद्यान विभाग प्रमुख मेहर लहारे, के.के देशमुख तसेच यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाले की, अहमदनगर शहरांमध्ये आता महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे.नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे व समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी महापालिका स्वच्छतेचे काम करणार आहे असे त्या म्हणाल्या.यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,आ संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये महिन्यातून दोन दिवस स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे,यामध्ये घनकचरा विभाग,उद्यान विभाग,बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग हे सहभागी होणार आहे. शहरातील एका-एका भागात जाऊन स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे,आज राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरवासीयांनी कामाचे कौतुक केले आहे त्यामुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्साह प्राप्त झाला आहे.केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेबाबत वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात आता महापालिकेनेही स्वतःचे कर्तव्य स्वतःचा स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे,या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना मनपा आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, पदाधिकारी व अधिकारी रस्त्यावर उतरून काम केल्यास समाजामध्ये चांगला संदेश जाण्याचे काम होते, आज हे अभियान बस स्थानक परिसर, आंबेडकर रस्ता, टिळक रोड, माळीवाडा वेस, आयुर्वेद कॉर्नर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली आहे.यामध्ये रस्त्यावरील माती,गवत,दगड गोटे व अतिक्रमणे काढण्यात आली आहे महिन्याभरात दोन दिवस हा उपक्रम राबवला जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या