Ticker

6/Breaking/ticker-posts

सरकार ‘कोरोना’मुळे नागरिकांच्या प्रश्नांन बगल देत आहे - चंद्रशेखर बावनकुळे

 भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला नगरचा संघटनात्मक आढावा






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अ.नगर : सध्या आघाडी सरकार कोरोनाचे कारण पुढे करत नागरिकांच्या प्रश्नांना बगल देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. भाजपा प्रणित केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. परंतु ज्या लोकांना या योजनांचा लाभ मिळत नाही, त्या लोकांपर्यंत भाजपाच्या कार्याकर्त्यांनी पोहचून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन  भाजपा सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

 बावनकुळे पुढे म्हणाले की, सत्तेतील मंत्री, आमदार फक्त घोषणा करत आहेत परंतु प्रत्यक्षात कार्यवाही काही होत नाही. या विरोधात कार्यकर्त्यांनी आवाज उठविला पाहिजे. मोर्चे, आंदोलने, निवदने या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यावे, त्याबरोबरच पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. नगर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी पक्षाच्या कार्यात सक्रिय आहेत. असेच काम यापुढेही सुरु ठेवावे. वरिष्ठ पातळीवर आपणास सहकार्य केले जाईल, असे त्यानी सांगितले.

 यावेळी भा.ज.यु.मो शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले म्हणाले, भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाशी युवा कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम पदाधिकारी करत आहेत. युवक, विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते नेहमीच पुढाकार घेत असता. असे सांगून संघटनेचा आढावा सादर केला.

 भाजपा सरचिटणीस तथा भा.ज.यु.मो प्रदेश प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता युवा मोर्चा विक्रांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहर जिल्हा व दक्षिण ग्रामीण भारतीय जनता युवामोर्चा, युवा वॉरीयर्सहेल्थ वॉरीयर्सच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच सारडा कॉलेज  येथे संपन्न झाली.  यावेळी युवा वॉरीयर्स प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष भैय्या गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भा.ज.यु.मो शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, दक्षिण जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, भा.ज.यु.मो प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी सचिन तांबे, योगेश मैंद, कपिल पाटील, प्रदेश सचिव हर्षल विभांडीक, विजय बनछोडे, अनिकेत पाटील आदि उपस्थित होते.

 यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकित संचेती, मा.किरण बोराडे, जय नागर, अमृत मारणे, प्रदेश कार्यालयीन प्रमुख प्रशांत सपकाळे, भाजपा सरचिटणीस तुषार पोटे, मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे, भा.ज.यु.मो शहराचे सरचिटणीस आशिष आनेचा, अमोल निस्ताने, युवा वॉरीयर्स जिल्हाध्यक्ष विशाल खैरे, उपाध्यक्ष किरण जाधव , अभिषेक शिंदे, सिद्धेश नाकाडे, चिटणीस यश शर्मा, वैभव झोटिंग, सुजित खरमाळे, अभिषेक वराळे, डॉ.दर्शन करमाळकर, प्रसिद्धी प्रमुख अभिजीत सोनवणे, सहप्रमुख कार्तिक तगारे, मीडिया प्रमुख सुबोध रसाळ, सहप्रमुख आदेश गायकवाड, कार्यालयीन प्रमुख अजित कोतकर, विद्यार्थी शहर संयोजक आकाश सोनवणे, सहसंयोजक मयूर राजपुरोहित, आत्मनिर्भर भारत योजनेचे संयोजक सिद्धार्थ ठाकूर, निलेश सातपुते, सिद्धार्थ गादिया, अँड.आशिष पोटे, कार्यकारिणी सदस्य पियुष संचेती, साहिल शेख, रमेश थडाकीया, पवन चुटके

तसेच भा.ज.यु.मो दक्षिण ग्रामीणचे राहुरी तालुकाध्यक्ष भाजयुमो रवींद्र म्हसे, पारनेर तालुकाध्यक्ष विश्वास रोहकले, पाथर्डी तालुकाध्यक्ष सचिन वायकर कर्जत, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, नितीन नलगे, नगरशहर तालुकाध्यक्ष शुभम भामरे, भाजयुमो दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, सरचिटणीस गणेश कराडउदय पवार, भाजयुमो दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष तुषार पवार, जामखेड तालुका अध्यक्ष शरद कारले, शेवगाव युवामोर्चा अध्यक्ष सचिन वारकड, मंगेश दूत, भा.ज.यु.मो शहर व दक्षिण ग्रामीण चे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या