Ticker

6/Breaking/ticker-posts

निसर्गाच्या विरोधात जाण्याचे धाडस कुणी करू नये- मंत्री तनपुरे

 कोल्हार येथे कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डी-करंजी: कोरोना महामारीच्या काळामध्ये प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्व समजले त्यामुळे निसर्गाच्या विरोधात जाऊन काहीतरी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे दुष्परिणाम आपणा सर्वांना भोगावे लागतात त्यामुळे वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज असून कोणीही निसर्गाच्या विरोधात जाण्याचे धाडस करू नये असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

 कोल्हार येथे कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कोल्हुबाई विकास मंडळ,आई साहेब विकास मंडळ व त्रिदल सैनिक संघटनेच्या माध्यमातून 551 विविध झाडांचा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री तनपुरे यांच्यासह माजी सभापती संभाजी पालवे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आली.

 मंत्री तनपुरे म्हणाले माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित केली जाणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत भविष्यकाळात  माजी सैनिकांना प्रशासनाकडून त्यांचे प्रश्न सोडवताना अडथळे येऊ नयेत त्यांना अपमानास्पद वागणूक मिळू नये याची निश्चितपणे दक्षता घेतली जाईल असा विश्वास मंत्री तनपुरे यांनी यावेळी दिला.


कोल्हुबाई विकास मंडळाच्या माध्यमातुन सह्याद्री हरिशचंद्र बालाघाट गर्भगिरी पर्वत रांगेच्या कुशीत असलेल्या कोल्हुबाई मातेच्या गडावर पिंपळ, जाभुळ, चिंच, शिसम या वृक्षाचे रोपन करण्यात आले. त्रिदल सैनिक सेवा संघाचे गौरव गर्जे, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे,सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, गजेंद्र पालवे, अशोक डमाळे, रेवन डमाळे,भुमीअभिलेख अशोक गिते,प्रा. दत्तु डमाळे,विजय पालवे,तुकाराम पालवे, सनी जावळे, उद्योजक उद्धव गिते,गोरख पालवे मेजर,भाऊसाहेब डमाळे यांनी कोल्हुबाई गड परिसर पर्यटनस्थळ बनवण्यासाठी सर्वाती मदत करण्याचे म्हटले आहे. 

वृक्षरोपण कार्यक्रम प्रसंगी महिला अघाडीच्या अनिता नेटके, सरपंच शिवाजी पालवे, उपसरपंच कारभारी गर्जे,बाबाजी पालवे,अशोक पालवे, महादेव गुरुजी,विजय पालवे, राणाप्रताप पालवे,सचिन पालवे,अमोल डमाळे,अनिल पालवे,अजिनाथ पालवे,अक्षय डमाळे, विजय पालवे,भरत जावळे, मयुर गर्जे,नवनाथ पालवे,कुमारपालवे,गोकुळ पालवे,बहिरु नेटके, देविदास गीते,संतोष पालवे,किशोर पालवे,रवी पालवे, गोकुळ पालवे,मदन पालवे,अॅड संदिप जावळे, पोपट पालवे,राहुल पालवे,सचिन पालवे, सचिन जावळे,मयूर गर्जे, संतोष पालवे, रवींद्र पालवे, सुनील डमाळे व ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या