करमणवाडीत
घनवन वृक्षलागवड; विकासासाठी
गट-तट विसरून ग्रामस्थांचा एकोपा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत: निसर्ग एकदा चिडला की भल्याभल्यांना हात
टेकावेच लागतात.निसर्गावर मानवाने केलेले अतिक्रमण आता थांबवावे लागेल अन्यथा पुरासारख्या प्रलयांना आपल्याला
वारंवार तोंड द्यावे लागेल.आपले आयुष्य वाचवण्यासाठी झाडांची लागवड व वृक्षसंवर्धन
करणे खुपच गरजेचे आहे. बाबांनो,आपण मेल्यानंतर किमान आपल्या
अंत्यविधीला पुरतील एवढी तरी झाडे लावायला हवीत असे मत
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
करमणवाडी
(ता.कर्जत) येथे 'चला समृद्ध गाव घडवूया' संकल्पनेतून घनवन वृक्षलागवड करण्यात आली.या निमित्त त्या बोलत होत्या.गाव
हरित करण्यासाठी सध्या या गावातील गट तट विसरून सर्वपक्षीय मंडळी एकत्र आली आहेत. आ.
रोहित पवार यांच्या माध्यमातून या गावांना शासनाच्या विविध योजना प्राधान्य
क्रमाने दिल्या जाणार असल्याचे मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केले. वनाधिकारी गणेश
छबिलवाड,सहाय्यक गट विकास अधिकारी रुपचंद जगताप आदींनीही
शासकीय योजनांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना सांगितली. सध्या १ किमी अंतर असलेला
धुमकाईफाटा ते खेडरस्ता,करमणवाडी गावठाण ते पावणे वस्ती रस्ता,
धार्मिक मंदिरे, शाळा, सार्वजनिक
ठिकाणांवर विविध जातींची देशी झाडे लावण्यात आली .
या
कार्यक्रमासाठी सरपंच भरत पावणे,
उपसरपंच अनिता खराडे, माजी सरपंच अंकुश बनसोडे,ग्रामसेवक हनुमंत गदाडे,वनाधिकारी गणेश छबिलवाड,सहाय्यक गट विकास अधिकारी रुपचंद जगताप,वनपाल रमेश
पवार,वनरक्षक सुरेश भोसले,वनरक्षक दिपक
गवारे,वनमजुर विठ्ठल गवळी,ग्रा. पं.
सदस्य अनिल वायसे,किसन पवार, सुनिल
खराडे तसेच गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या