Ticker

6/Breaking/ticker-posts

स्व.गोपाळराव झोडगे यांनी भिंगार बँकेला प्रतिष्ठा मिळवून दिली - अनिलराव झोडगे

 स्व.गोपाळराव झोडगे यांच्या स्मृतीदिनी अभिवादन.

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर:भिंगार बँकेने नेहमीच सभासदठेवीदारकर्जदार यांच्या हितांचे निर्णय घेऊन सर्वसामान्यांना   आर्थिक पत निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला आहेया कार्यात स्व.गोपाळराव झोडगे यांनी भिंगार अर्बन   बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.   सर्वसामान्य माणूस बँकेशी जोडून त्यांना त्यांच्या  पायावर उभे करण्याचे काम केलेबँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांची प्रगती साधली आहेबँकेच्या जडणघडणीत स्व.नानांनी दिलेले योगदान कोणीही विसरु.   शकत नाही.  त्यांनी बँकेच्या हितासाठी घेतलेले निर्णय  बँकेला प्रतिष्ठा मिळवून दिलेत्यामुळेच बँकेलाही वेळो वेळी अनेक राष्ट्रीय  राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेही त्यांच्या कार्याची पावती आहेत्यांचे हे कार्य आपण यापुढेही असेच सुरु ठेवून बँकेला  आणखी प्रगतीपथावर नेण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहेअसे  प्रतिपादन भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव   झोडगे  यांनी केले.

 भिंगार बँकेचे माजी चेअरमन गोपाळराव झोडगे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भिंगार बँकमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलेयाप्रसंगी चेअरमन अनिल झोडगेव्हाईस चेअरमन किसनराव चौधरीज्येष्ठ संचालक नाथाजी राऊतराजेंद्र पतकेनामदेव लंगोटेएकनाथ जाधवअमोल धाडगेतिलोत्तमा करांडेआर.डी.मंत्रीरमेश परभानेविजय भंडारीआर.एस.बोरामुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत   महाजनअसि.मॅनेजर मच्छिंद्र पानमळकर आदि   उपस्थित होते.

 याप्रसंगी  संचालक आर.डी.मंत्री म्हणाले,  भिंगार   बँकेने आज राज्यात आपला वेगळा लौकिक निर्माण  केला आहेयाचे श्रेय हे स्व.गोपाळराव झोडगे यांना जातेउद्योजकांबरोबर सर्वसामान्यांनाही स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम बँकेने केले आहेबँकेचा चढता आलेख असा सुरु राहीलअसे सांगितले.याप्रसंगी व्हाईस   चेअरमन किसनराव चौधरीसंचालक नाथाजी राऊतराजेंद्र पतकेनामदेव लंगोटेमच्छिंद्र पानमळकर आदिंनी स्व.गोपाळनाना झोडगे यांच्या कार्याचा गौरव करुन श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव लंगोटे यांनी केले तर आभार शशिकांत महाजन यांनी मानलेयाप्रसंगी   शाखाधिकारी संतोष मिसाळसचिन थोरातसंदिप पाटीलसागर पुंडमच्छिंद्र जाधव आदिंसह सर्व कर्मचारी वृंद   उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या