Ticker

6/Breaking/ticker-posts

‘चौकशाना घाबरत नाही, कितीही चौकशी करा ; काहीच निष्पन्न होणार नाही’- प्रा. राम शिंदे

 

 *रोहित पवार एक दिवस येतात आणि दहा-पंधरा फोटो काढून जातात






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कर्जत :मतदारसंघातील कामांबद्दल मी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून उत्तरे मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात,’ अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केली आहे. जलयुक्त शिवार कामाची चौकशी कर्जत तालुक्यातच जास्त सुरू आहे. पण कितीही चौकशी करा, यातून काहीच निष्पन्न होणार नाही,’ असे आव्हानही त्यांनी दिले. 

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या पुढाकारातून झालेल्या विविध कामांचे उद्घाटन प्रा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी खेडकर यांच्या कामाचे कौतूक करताना आमदार पवार यांच्यावर टीका केली.


शिंदे म्हणाले, ‘मागील सरकारच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी जास्त प्रमाणात आपल्या कर्जत तालुक्यातच करण्यात येत आहे. ती कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, यामध्ये काहीही आढळून येणार नाही. त्यावेळी जलसंधारणाची सर्व कामे जनतेच्या हितासाठीच झाली होती. गावात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद झाले, पाणी उपलब्ध झाल्याने पिके चांगली आली. हाच ही कामे योग्य पद्धतीने झाल्याचा पुरावा आहे. त्यामुळे माझे आव्हान आहे की चौकशी कराच.'

'मतदार संघातील कामासंबंधी मी अनेकदा प्रश्न विचारले. मात्र, आमदार पवार माझ्या प्रश्नांना उत्तरे देण्यास घाबरतात की काय? त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने जनता आणि विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची त्यांची जबाबदारी आहे. मात्र, ते उत्तरे देत नाहीत, हे आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे. 

या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मतदार संघात रहात नाहीत. कधीतरी एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून ते सोशल मीडियामधून रोज एक कार्यक्रम घेतल्याचे दाखवितात. सध्यातरी मतदारसंघाचा विकास फक्त सोशल मीडियातून सुरू आहे. मतदारसंघातील जनतेला मागील निवडणुकीच्या काळात भानामती काय असते, हे समजले आहे. पुढील काळामध्ये तालुक्यातील जनता मागे झालेली चूक नक्कीच दुरुस्त करील, अशी मला आशा वाटते,’ असेही शिंदे म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या