Ticker

6/Breaking/ticker-posts

पुढेही.. विकासाची कावड वाहणार : धनंजय मुंडे

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

बीड :परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची सेवा आम्ही पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत व पुढेही ती सुरूच राहील, श्रावण महिन्यात गंगेतील पाणी घेऊन येणारी कावड आम्ही कधी चुकू दिली नाही, तशाच पद्धतीने आता विकासाची 'कावड' वाहू असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीधनंजय मुंडे यांनी गुरुवारी येथे केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, जुन्या तहसील भागात, भक्तनिवासाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून या कामासाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ते म्हणाले की, परळीत सुरू असलेल्या विकास कामांमुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे, मात्र कमीत कमी वेळेत ही कामे पूर्ण केली जातील.

भूमिपूजनास मुंडे यांच्यासह आमदार संजय दौंड, वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख, नगराध्यक्षा सरोजनी हलगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, जि. प. गटनेते अजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, शरद मोहरीर, बाळकृष्ण पूजारी, भास्करराव चाटे आदी उपस्थित होते.

परळीतील संत भगवानबाबा चौक ते तहसील कार्यालय व दोस्ती टी हाउस ते अग्रवाल आइस फॅक्टरी या दोन सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजनही त्यांच्याहस्ते झाले. त्याशिवाय
परळी ते चांदापूर रस्त्यावरील घनशी नदीवर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेले साखळी बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर मुंडे यांच्या हस्ते जलपूजन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या