Ticker

6/Breaking/ticker-posts

पोलिस अधिकाऱ्यांनी मागितली दोन कोटींची लाच ; मुंबई 'एसीबी'च्या कारवाईने खळबळ

 

*उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस नाईक यांनी एका प्रकरणात दोन कोटींची लाच मागितली.

*तडजोडीनंतर दीड कोटी ठरलेल्या रकमेतून दहा लाख घेताना मुंबईच्या पथकाची कारवाई.लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 औरंगाबाद: सेलू (जि.परभणी) येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस नाईक यांनी एका प्रकरणात दोन कोटींची लाच मागितली. तडजोडीनंतर दीड कोटी ठरलेल्या रकमेतून दहा लाख घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केली, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त आबासाहेब पाटील यांनी शनिवारी (२४ जुलै) सकाळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.


या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण या दोघाविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपघाताच्या गुन्ह्यातून एकाला वाचविण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे. यातील तक्रारदाराच्या मित्राचा अपघातात मृत्यू झाला होता. मे २०१९ मध्ये सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेनंतर एक ऑडिओ क्लीप बाहेर आली होती. त्यामध्ये तक्रारदार आणि त्याच्या मृत मित्राच्या पत्नी यांच्यातील संभाषण असल्याचा दावा केला आहे. त्या क्लीपच्या आधारे डीवायएसपी पाल यांनी ९ जुलै २०२१ रोजी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून घेतले. ती व्हायरल झालेल क्लीप आपल्याकडे असून त्यातून बाहेर पडायचे असेल तर दोन कोटी रुपयांची लाच द्यावी लागेल, असे पाल यांनी तक्रारदाराला सांगितले होते. त्यानंतर सतत फोन करून धमकीही दिली होती. शेवटी या त्रासाला कंटाळून तक्रारदार व्यक्तीने मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर सापळा रचून पुढील कारवाई करण्यात आली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या