Ticker

6/Breaking/ticker-posts

जेंव्हा.. आमदार मोनिका राजळे यांचा पारा चढतो, टंचाई आढावा बैठक रद्द, तहसीलदार पागिरेंवर कारवाईची केली मागणी

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

शेवगाव: आमदार मोनिका राजळे  या दोन दिवसीय अधिवेशनाचे कामकाज संपवून काल शेवगाव  येथील आयोजित आढावा बैठकीसाठी पहाटेच  मुंबईवरून निघून बैठकीपूर्वी पोहोचल्या, मात्र  यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे गैरहजर होत्या. तालुक्याच्या गंभीर प्रश्नांपेक्षा तहसीलदारांना त्यांचे काम महत्वाचे वाटते  का ? असा सवाल आ. राजळे  यांनी उपस्थित करून त्यांच्या या बेजबाबदार वर्तुनुकीची तक्रार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल मंत्री यांच्याकडे केली असून या संपूर्ण प्रकारची चौकशी करून योग्य ती तत्काळ  कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे. आ . राजळे यांच्या आक्रमक पवित्र्याने प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे .

 

तालुक्यात गेले महिनाभरपासून पावसाने मारळिली दडी  त्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भिती , आरोग्य सुविधा, लसीकरण, भविष्यात कोविडचा प्रसार होऊ नये याकरिता राबविण्याच्या विविध उपायोजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, विविध विकास कामे तसेच महसूल मधील प्रलंबित कामे आदीबाबत शेवगाव तालुक्याची आढावा बैठक घेण्याची सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकान यांना २ जुलै रोजी दिल्या होत्या, याप्रमाणे तहसीलदार शेवगाव यांनी ७  जुलै रोजी आढावा बैठक आयोजित करून सर्व विभाग प्रमुख यांना पत्राद्वारे सूचित केले, त्यानुसार सर्व विभाग प्रमुख तसेच प्रांताधिकारी देवदत्त केकाण बैठकीस उपस्थित राहिले.

 

 

बैठकीस तहसीलदार अर्चना पागिरे मात्र गैरहजर होत्या. त्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आयोजित केलेल्या बैठकीस गेल्याचे सांगण्यात आले, परंतु जिल्हाधिकारी  कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर असे समजले की नगरला  कोणतीही मीटिंग आयोजित केली नव्हती. तहसीलदार यांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्यामुळे त्यांच्यावर आमदार राजळे चांगल्याच संतापल्या .या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी व पदाधिकाऱ्यानी आमदार राजळे यांच्या पुढे तहसीलदार यांच्या बाबत असंख्य तक्रारीचा पाढा वाचला . प्रकरणे प्रलंबित ठेवणे, लोकांना दुरुत्तरे देणे, लोकांचे म्हणणे ऐकून न घेणे, लोकप्रतिनिधींनी सुचाविलेलेली कामे मुद्दाम प्रलंबित ठेवणे अशा अनेक तक्रारी केल्या. शेवगावच्या तहसीलदार यांचा कार्यकाळ नेहमी वादग्रस्त ठरत आहे. जनतेत मोठी  नाराजी असून याचा अनुभव दस्तुरखुद्द आ. मोनिका राजळे यांनाच आल्याने सर्वसामान्यांची तेथे काय अवस्था होत असेल याची कल्पना आ . राजळे यांना आली त्यामुळे त्यांचा पारा चांगलाच चढला. बैठक रद्द करून त्यांनी तत्काळ पागिरे यांची चौकशी करण्याची व कारवाईची मागणी केली . या प्रकारची तालुका भर चर्चा झडत होती.

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या