Ticker

6/Breaking/ticker-posts

पिंपरी जलसेन येथील युवकाचे अपहरण प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

पारनेर: पिंपरी जलसेन येथील आकाश बबन काळे या युवकाचे अपहरण करून ५० हजार रुपये खंडणी मागितली तसेच लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकारणी पारनेर येथील सचिन बाबाजी बोरुडे, अशोक बोरुडे, संग्राम चंद्रकांत कावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,गेल्या आठवड्याभरापूर्वी पिंपरी जलसेन येथील एक युवकाचा चिंचोली येथे पठारवाडीच्या वयस्कर व्यक्तीस मोटरसायकलचा धक्का लागला होता.  सदरचा प्रकार मिटविण्यासाठी आकाश काळे हा सोबत आला होता याचा राग मनात धरून पिंपरी जलसेन येथील आकाश काळे या युवकाला मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास त्याचे राहते घरातून इनोव्हा गाडीतून अपहरण करण्यात आले. तसेच त्याला काठी व लोखंडी गजाने मारहाण करूण्यात आली, यात त्याचा हात मोडला व त्याच्याकडून ५० हजार रुपये खंडणी मागण्यात आली.  व त्याला हत्तलखिंडी भागात सोडण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन आकाश काळे याला रुग्णालयात दाखल केले. आकाश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर येथील सचिन बाबाजी बोरुडे, आकाश बोरुडे व संग्राम चंद्रकांत कावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या