Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत नगरपंचायतीने पंतप्रधान नरेंद्र मोदिंचा आवाज केला बंद ; भाजप कार्यकर्ते आक्रमक..

 *स्वच्छता अभियानाच्या सर्व ऑडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान यांच्या वक्तव्याचा समावेश करण्याची मागणी

*या क्लिप तीन वेळा उल्लेख करण्याची भाजपची  मागणी मुख्याधिकारी यानी केली मान्य

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कर्जत : स्वच्छता अभियानाच्या गाड्यांमध्ये ज्या ऑडिओ क्लिप लावण्यात आल्या आहेत त्यातील सर्व ऑडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान यांच सम्भाषण नगरपंचायतीने हट्विले होते. याचे तीव्र पडसाद भाजपच्या  गोटात उमट्ले. त्यामध्ये बदल का केला पंतप्रधान यांचे नाव जाणीवपूर्वक वगळले गेले आहे व या मध्ये कुठेही पंतप्रधान यांचे नाव नाही, असा आरोप करीत भाजप कार्यकर्त्यानी काल मुख्याधिकारी याना घेराव घातला.

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव नगरपंचायत ने स्वच्छता अभियान मधून हटविले याचा निषेध करून पुन्हा एकदा सर्व ऑडिओ क्लिप मध्ये पंतप्रधान यांच्या वक्तव्याचा समावेश करावा अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या वतीने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना दिले. यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव गणेश शिरसागर  शहराध्यक्ष वैभव शहा ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर कांचन खेत्रे आशा वाघ राखी शहा मनीषा वडे मंदा होले अश्विनी दळवी पप्पू शेठ दोधाड निखिल सूर्यवंशी राजेंद्र येवले आकाश शिरसागर संजय जाधव सचिन पवार उमेश डमरे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.

 यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव हटविले नसून पूर्वीच्या क्लिप मध्ये काही त्रुटी असल्यामुळे व सध्या प्रशासकीय राजवट असल्यामुळे बदल केले आहेत व पूर्वी लहान असलेली क्लिप आता मोठी म्हणजे नऊ मिनिटाच्या क्लिप मध्ये तेरा सेकंद मोदी साहेबांचे आवाज आहे असे सांगितले. मात्र यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही व त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ऑडिओ क्लिप मध्ये प्रत्येक अभियानाची क्लिप सुरू होताना असावे अशी आग्रही मागणी केली . अखेर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या क्लिप मध्ये सुरुवातीला मध्ये आणि शेवटी असा तीन वेळा उल्लेख करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली व ती मुख्याधिकारी यांनी मान्य केली. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांचे समाधान झाले आणि त्यांनी आंदोलन स्थगित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या