Ticker

6/Breaking/ticker-posts

शहर स्वच्छ‍ व सुंदर ठेवा अन्यथा कारवाई - महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे

 *घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाची बैठक संपन्‍न.






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अ. नगर : शहरामध्‍ये स्‍वच्‍छता अभियान राबवून या शहराचे नांव देशामध्‍ये आलेले आहे. कोवीड प्रादुर्भावाच्‍या काळात देखील शहर स्‍वच्‍छ असल्‍यामुळे नागरिकांचे आरोग्‍य चांगले राहण्‍यास मदत झाली आहे. यापुढे देखील कर्मचा-यांनी शहर स्‍वच्‍छ ठेवण्‍याच्‍या दृष्टिने प्रयत्‍न करावे. दैनंदिन साफसफाई झाली पाहिजे. स्‍वच्‍छते बाबत कामात कोणीही हलगर्जीपणा केल्‍यास त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यानी दिला.

 घनकचरा विभागाची आढावा बैठक काल महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी घेतली. यावेळी नगरसेवक.सचिन शिंदे, गणेश कवडे,.शाम नळकांडे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, विरोधीपक्ष नेता संपत बारस्‍कर, उपायुक्‍त.यशवंत डांगे, घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रमुख डॉ.शेडाळे, स्‍वच्‍छता निरिक्षक किशोर देशमुख, परिक्षीत बिडकर,.टी.एन.भांगरे, किशोर कानडे, सहाय्यक स्‍वच्‍छता निरिक्षक आदी उपस्थित होते.

 महापौर सौ. शेंडगे म्‍हणाल्‍या की,कच-याचे ढिग उचलले पाहिजे. मनपाचे टॅक्‍टर चालू करावा. प्रत्‍येक झोनला प्रत्‍येकी एक टॅक्‍टर कामासाठी देणार आहे. केडगांव येथील भूषणनगर ते  लिंकरोड  पर्यतचा कचरा उचलावा. ज्‍या ठिकाणी दाट वस्‍ती आहे त्‍या ठिकाणी साफ सफाई वेळेवर झाली पाहिजे. कोणतेही कारण कर्मचा-यांनी देवू नये. कामकाज व्‍यवस्‍थीत झाले नाही तर संबधीत स्‍वच्‍छता निरिक्षक यांचेवर कारवाई करणार असे मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले.        यावेळी बुरूडगांव सर्व्‍हे नं. 34 येथील 100 मे.टन क्षमतेचा प्रोसेसिंग प्‍लॅट मशिनरी उभारणे व देखभाल व दुरूस्‍ती करणे तसेच बायोमिथेशन प्‍लॅट उभारणी करणे. बुरूडगांव कचरा डेपो येथील साठलेल्‍या 1 लक्ष क्‍युबीक मिटर कच-यावर प्रक्रिया करण्‍याचे काम देखील सुरू आहे. तसेच बुरूडगांव सर्व्‍हे नं. 34 या ठिकाणी मृत जनावरे याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी प्र‍कल्‍प देखील सुरू आहे. यासर्व प्रकल्‍पाची माहिती घेतली.

 यावेळी सदस्‍यांनी चर्चेत भाग घेवून संबधीत विभाग प्रमुख यांच्‍या बरोबर चर्चा करून सुचना केल्‍या. उपायुक्‍त यशवंत डांगे यांनी सर्व स्‍वच्‍छता निरिक्षक यांना सुचना देवून सांगितले की प्रत्‍येक प्रभागामध्‍ये दररोज वेळच्‍या वेळेला स्‍वच्‍छता झाली पाहिजे. प्रत्‍येक कर्मचा-यांने जबाबदारीने काम करावे. संपूर्ण शहरातील खाजगी तत्‍वावर कचरा संकलन व वाहतुक करण्‍याचे काम एजन्‍सी मार्फत चालू आहे. त्‍यांच्‍या प्रतिनिधीने सुध्‍दा नागरिकांचे कामे न चुकता करणे आवश्‍यक आहे मा.शासनाच्‍या 15 व्‍या वित्‍त आयोगातून घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागासाठी आवश्‍यक ती मशिनरी खरेदी करणार आहे. त्‍यामुळे शहरातील स्‍वच्‍छता आणखी लवकर होईल असे उपायुक्‍त श्री.डांगे यांनी सांगितले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या