Ticker

6/Breaking/ticker-posts

'भाजप गुणगान करत असलेल्या मुख्यमंत्र्यांचा पाचवा क्रमांक', रोहित पवारांचा टोला

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : करोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील प्रमुख १३ राज्यांत सर्वेक्षण घेतले असून त्यात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. आ.रोहित पवार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिनंदन देखील केले आणि याच वेळी त्यांनी भाजपवर निशाणाही साधला आहे.

दरम्यान ' उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं. तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!' असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच समोर आलेले हे सर्वेक्षण महाविकास आघाडी आणि शिवसेनेला बळ देणारे ठरणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, 'प्रश्नम' या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे महाविकास आघाडी सरकारचं यश आहे.' असं ट्वीट रोहित पवारांनी केलं आहे. याच ट्वीट उत्तर देत त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे.

' उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!' अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या