Ticker

6/Breaking/ticker-posts

पुण्यातील लॉकडाऊन कधी उठणार? आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती


 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पुणे : करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून राज्यातील रुग्णसंख्याही अद्याप तितकीशी कमी झालेली नाही. त्यामुळेच निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसून आहेत ते निर्बंध कायम राहणार आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता पुण्यातील निर्बंधांबद्दलही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- महापालिका हद्दीत पुढील आदेशापर्यंत सध्याचेच नियम कायम लागू राहतील असा आदेश आयुक्त विक्रमकुमार यांनी काढला आहे. करोनाचा संभाव्य धोका अद्याप कमी झाला नसल्यामुळे पुणे शहरात लागू असलेले निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आयुक्तांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे याआधी जे निर्बंध लागू करण्यात आले होते तेच निर्बंध पुढील सूचना येईपर्यंत लागू राहणार आहेत.

नुसार, पुणे महापालिकेतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक 31 जुलै 2021 पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाईन शिक्षणासाठी मुभा देण्यात आलेली आहे. हे आदेश पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू असणार आहेत.

दरम्यान, इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे लसचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे, असे टोपे यांनी सांगितले. यापूर्वी राज्यात प्रवेश देताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पाहिला जात होता मात्र आता करोनाच्या दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच राज्यात प्रवेश दिला जाईल, असे टोपे म्हणाले. राज्यातील ९२ टक्के रुग्ण दहा जिल्ह्यांमध्ये आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे रुग्ण अधिक आहेत, असेही टोपे यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या