Ticker

6/Breaking/ticker-posts

जनता पाठीमागे असल्यावर भले भले वाकतात,,आ. निलेश लंके यांचा टोला


 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पारनेर : जरी माझ्याकडे संस्था, कॉलेज,कारखाने, पैसा नसला तरी  मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण  माझ्यावर प्रेम करणारी तालुक्यातील सर्वसामान्य जनताच माझी खरी संपत्ती आहे ही आणी जनता रुपी ताकद  भल्या भल्या बड्या शक्तीना वेळेला वाकवते त्यामुळे आपल्याला कशाचीही कमतरता भासत नसल्याचे प्रतिपादन आ निलेश लंके यांनी जवळा ता पारनेर येथे आदिवासी एकात्मिक विभाग खावटी वाटप कार्यक्रमात बोलताना केले.

 जवळे ता पारनेर येथे २२ जुलै रोजी विठ्ठल मंदिर संस्थेच्या सभागृहात आदिवासी बांधवांना शासकीय योजनेतून खावटी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते जवळा परिसरातील बावीस गावातील १९४  गरीब आदिवासी लाभार्थ्यांना  अन्नधान्य किराणा चे वाटप करण्यात आले.

 तालुक्यात आपण जवळे गावासाठी सुमारे दीड कोटी रु ची विविध विकास कामे दिली ती सामाज हित, आपले कर्तव्य म्हणून व प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या झोपडीपर्यंत विकासाची गंगा यावी म्हणून  भाळवणी येथील कोविड सेंटर मुळे अनेकांचे आपण प्राण वाचू शकलो व जनतेची सेवा करू शकलो हे जनतेच्याच आशीर्वादाने,,राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन तर कुणीही कामे करील, राजकारणात राजयोगाला प्रयत्नांची जोड हवी व कर्तव्याला नशिबाची साथ असेल तर कोणताही माणूस यशस्वी झाला म्हणून समजा.

 तरी आपण येत्या पंचायत समिती जिप निवडणुकीला असेच सहकार्य करा आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही असा शब्द देत निवडणुकीची नांदी सूरु झाल्याची कल्पना ही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना देत तालुक्यात सगळ्या दुकांनदाऱ्या बंद झाल्या आहेत आता आपलं एकच घर आहे सगळे एका छताखाली येऊन काम करू,,व विकासाचा डोंगर उभा करू असा विश्वास ही त्यांनी यावेळी दिला

 राज्यात एकच 'दादा'

आ निलेश लंके यांनी अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त  उपस्थिता समोर याच कार्यक्रमात बोलताना तालुक्यात, जिल्ह्यात ,अनेक 'दादा 'असतीलही व आहे, पण राज्यात एकच पॉवर फुल्ल  माणूस आहे आणि ते म्हणजे अजित 'दादा' त्यांच्या पुढे राज्यातील  भली भली  मंडळी वाकतात,,अधिकारी सरळ होतात,, यावेळी, जितेश सरडे ,संदीप सालके, भाऊ आढाव,सरपंच अनिता आढाव, उपसरपंच गोरख पठारे, किसनराव रासकर,राजेश्वरी कोठावळे,आड राहुल झावरे, सोमनाथ वरखडे,सुदाम पवार,आदी कार्यकर्ते उपस्थित  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या