Ticker

6/Breaking/ticker-posts

केंद्रप्रमुखांच्या प्रशासकीय बदल्या करू नयेत

 शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे सी.ई.ओंना निवेदन








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर : जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची संख्या कमी असल्याने अनेक केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे केंद्रप्रमुख संवर्गाच्या प्रशासकीय बदल्या न करता केवळ विनंती बदल्या कराव्यात अशी मागणी शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 या संदर्भात केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यभान काळे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष अविनाश गांगर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम ठाणगे, सरचिटणीस उत्तम फंड, सहचिटणीस बाळासाहेब दळवी, जिल्हासंघटक किशोर हारदे, शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, सुरेश खोडके आदींच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या भेटी घेवून केंद्रप्रमुखांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले

 निवेदन म्हंटले आहे की, केंद्रप्रमुखांना २ पेक्षा अधिक केंद्रांचा अतिरिक्त पदभार देण्यात येऊ नये, रिक्त पदे मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती देवून भरण्यात यावीत, तसेच शिक्षण परिषदेच्या तारखा बदलण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासन सकारात्मक असल्याचे जिल्हाध्यक्ष सूर्यभान काळे यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या