Ticker

6/Breaking/ticker-posts

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या 'या' भेटीमुळे गदारोळ

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या एका फोटोमुळे पाकिस्तानमध्ये गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आणि शरीफ विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफच्या कार्यकर्त्यांनी शरीफ यांना देशद्रोही म्हटले आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने हा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांनी शरीफ यांची लंडन येथे भेट घेतली. या भेटीत दोन्ही बाजूंच्या हिताच्यादृष्टीने चर्चा झाली असल्याची माहिती अफगाणिस्तान सुरक्षा परिषदेने दिली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि मुस्लीम लीग-नवाझ गटाचे नेते नवाझ शरीफ हे २०१९ पासून उपचाराच्या निमित्ताने लंडन येथे वास्तव्य करत आहेत. शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी खटले सुरू आहेत.

शरीफ यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली. पाकिस्तानमधील अनेकांनी शरीफ यांना पाठिंबा दर्शवला. तर, काहींनी शरीफ यांच्यावर टीका केली. पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनीदेखील टीका केली आहे. नवाझ शरीफ यांना पाकिस्तान बाहेर पाठवणे धोकादायक होते. त्यांच्यासारखे लोक आंतरराष्ट्रीय कटात सहभागी होत असल्याचे चौधरींनी म्हटले. नवाझ शरीफ यांचे जवळचे मित्र हे पाकिस्तानचे शत्रू असल्याची टीका त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या