Ticker

6/Breaking/ticker-posts

काश्मीर स्वतंत्र की पाकिस्तानमध्ये ?,जनमत घेणार- इम्रान खान ; भारताने पाकिस्तानला ठणकावले..!

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. स्वतंत्र काश्मीर हवा की पाकिस्तान हवा यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे जनमत घेतले जाणार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले. शुक्रवारी खान यांनी याबाबतचे वक्तव्य केले. आज, रविवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा प्रांत होणान नसल्याचेही खान यांनी म्हटले.

इम्रान खान यांनी म्हटले की, पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानचा प्रांत बनवणार नाही. काश्मीरला प्रांताचा दर्जा देण्याबाबतच्या चर्चा चुकीच्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रस्तावानुसार काश्मीरमधील नागरिकांना आपले भवितव्य ठरवण्याचा अधिकार मिळेल. त्याच वेळेस काश्मीरमधील लोक पाकिस्तानमध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ शकतील.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाच्या नेत्या मरियम नवाझ यांनी १८ जुलै रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या प्रचार सभेत खान सरकारवर तोफ डागली होती. काश्मीरचा दर्जा बदलणे आणि त्याला प्रांत बनवण्याचा निर्णय घेण्यात आहे. तर, इम्रान खान यांनी हे आरोप फेटाळताना म्हटले की, जनमताचा कौल घेतल्यानंतर काश्मीरबाबत निर्णय होणार आहे. स्वतंत्र राहण्याचा अथवा पाकिस्तानात राहण्याचा निर्णय काश्मीरची जनता घेणार आहे.

भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट सुरू केला होता. पाकिस्ताननेही पाकव्याप्त काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा सुरू होती. काश्मीरच्या स्वायत्त दर्जाच्या मुद्यावरून पाकव्याप्त काश्मीरच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप झाले.

दरम्यान, भारताने सातत्याने जम्मू-काश्मीर हा भारताचा हिस्सा असल्याचे पाकिस्तानला ठणकावले आहे. जम्मू-काश्मीरबाबतचा मु्द्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचेही भारताने पाकिस्तान ठणकावले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या