Ticker

6/Breaking/ticker-posts

' धाकटी पंढरी ' श्रीक्षेत्र वरुरला आषाढी एकादशी साधेपणाने साजरी

मंदिर बंद असल्यामुळे भाविकांनी घेतले मुखदर्शन
  






















श्रीविठ्ठल - रुक्मिणी स्वयंभू मूर्ती

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव :- ' धाकटी पंढरी ' असा लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र वरुर (ता.शेवगाव) येथे आषाढी एकादशी साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिर बंद असल्याने भाविकांनी मुखदर्शन घेणे पसंत केले.

       स्वयंभू असलेल्या श्रीविठ्ठल - रुक्मिणीच्या सावळ्या वालुकामय मूर्तीला सकाळी गंगा, गोदावरीच्या पवित्र जलाने प्रसाद अंचवले, सौ.मयुरी अंचवले, गणेश बेडके,सौ. सोनाली बेडके या दांम्पत्याच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर उभय दांपत्याच्या हस्ते महाआरती झाली. दिलीपदेवा अंचवले यांनी पौरोहित्य केले. वरुरचे सुपुत्र श्रीराम गोसावी यांचे तर्फे योगेश तायडे यांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक पानाफुलांनी पूजा बांधली. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे रुपडे आणखीनच खुलले.

    देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले, सौ.अरुणा अंचवले, दिलीप अंचवले,सौ. स्वाती अंचवले, मुकुंद अंचवले, मोहिनी अंचवले आदी यावेळी उपस्थित होते. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त असल्याने दर्शनासाठी भाविकांची वर्दळ अत्यंत कमी होती. भगूर आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गजेंद्र खांबट यांचे नेतृत्वाखालील पथकाने भाविकांची आरटीपीसीआर टेस्ट केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या