Ticker

6/Breaking/ticker-posts

पुन्हा एक हनी ट्रॅप उघडकीस ; पाथर्डीतील बागायतदार अड्कला ?

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: व्यापारी, व्यावसायिक, सरकारी अधिकारी, बागायतदार यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बदनामीची भीती घालायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. असे हनी  ट्रॅप लावून लुटमार करण्याचे प्रकार नगर जिल्ह्यात वाढले आहेत. नगर तालुका, अकोले, संगमनेरनंतर आता पुन्हा नगर शहरात असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पाथर्डीतील एका बागायतदाराला दोन लाख रुपयांना लुबडणारी टोळी गुन्हा दाखल होताच फरार झाली आहे.

 वडगाव गुप्ता परिसरात राहणार्‍या एका तरूणीने अन्य दोघांच्या साथीने पाथर्डी तालुक्यातील एका बागायतदाराला अडकविल्याचे उघडकीस आले आहे. स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बागायतदाराने या टोळीला दोन लाख रुपये दिले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, आरोपी हाती लागलेले नाहीत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वडगाव गुप्ता येथील तरूणी, तिचा कथित पती व पाथर्डी तालुक्यातील एक साथीदार यांचा समावेश आहे. तिघेही सध्या पसार असून एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जून महिन्यात १५ व १६ तारखेला ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसीतील या तरुणीने बायगायतदाराशी फोनवर बोलून मैत्री केली. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १५ जूनला सायंकाळी त्यांना घरी बोलावून घेतले. बागायतदारही तिच्या बोलण्याला फसून तिच्या घरी आले. तेव्हा ती घरी एकटीत होती. काही वेळाने तिचा पती असल्याचे सांगणारा व्यक्ती घरी आला. दोघांना एकत्र आल्याचे पाहू त्याला राग आल्याचे भासवून त्याने बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रपये काढून घेतले. दुसर्‍या दिवशी पाथर्डी तालुक्यातील एकाला मध्यस्थी ठेवत बागायतदाराकडून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले.त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात आले. त्यांनी झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी तपास सुरू केला. मात्र, आरोपी पसार झालेले आहेत. तांत्रिक मदतीने तपास सुरू केला आहे.

नगर जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. पूर्वी दबक्या आवाजात अशा प्रकारांची चर्चा होत असे. मात्र, काही महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील जखणगाव येथील घटनेचा गुन्हा दाखल झाला. तेथेही एका बागायतदाराची आणि नंतर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. प्रथम बागायतदाराने आणि नंतर अधिकाऱ्याने फिर्याद दिली. तेथे किराणा दुकान चालविणारी महिला आणि तिचा साथिदार पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. त्यानंतर अकोले, संगमनेरमध्येही मागील आठवड्यात अशा घटना घडल्या. या घटनांची चर्चा होत आहे, त्यांच्या बातम्या प्रकाशित होत आहेत, तरीही लोक संबंधित महिला आणि साथिदांराच्या बोलण्याला फसून सापळ्यात अकडत आहेत.

सोशल मीडियाचा वापर

काही टोळ्या यासाठी सोशल मीडियाचाही वापर करीत असल्याचे पुढे आले आहे. गेल्या आठवड्यात शहरातील एका सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला फसविण्याचा प्रयत्न झाला. वेळीच सावध झाल्याने हा प्रयत्न फसला. यातील एका अनोळखी महिलेने सुरवातीला सामाजिक कार्यकर्त्याशी सोशल मीडियातून संपर्क केला. त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉल करून स्वत:चे अश्लील चित्रिकरण सुरू केले. हा प्रकार लक्षात आल्यावर कार्यकर्त्याने कॉल बंद केला, याची माहिती संबंधित यंत्रणांना दिली. त्यामुळे महिलेचा प्रयत्न फसला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या