Ticker

6/Breaking/ticker-posts

औरंगाबादमध्ये लाँच होणार 'ही' दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, २ हजार रुपयांत बुकिंग सुरु

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 औरंगाबाद : पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या दरांमुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत आहे. अशात देशातील प्रमुख ऑटो कंपनी Bajaj Auto (बजाज ऑटो) आपली नागपूरपाठोपाठ आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर Bajaj Chetak Electric लवकरच औरंगाबादमध्ये लाँच करणार आहे. अशी घोषणा कंपनीने सोशल मीडियाद्वारेही केली आहे.

औरंगाबादसोबतच कंपनी ही स्कूटर मैसूर आणि बॅगलोर या दोन शहरांमध्येही उपलब्ध करणार आहे. चेतक इलेक्ट्रिक स्कूटरसाठी औरंगाबाद, मैसूर आणि मँगलोर या तिन्ही शहरांमध्ये बुकिंगला सुरूवात झाली आहे. जर तुम्ही औरंगाबादमध्ये राहात असाल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेतक इलेक्ट्रिकसाठी बुकिंग करू शकतात. बजाजने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून औरंगाबादमध्ये बुकिंगला सुरूवात झाल्याची माहिती दिली आहे.

 गेल्या आठवड्यातच चेतक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरमध्ये लाँच केली होती. बजाज ऑटोने औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रिकसाठी बुकिंगलाही सुरूवात केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असताना चेतक इलेक्ट्रिकची जास्तीत जास्त शहरात विक्री सुरू करण्याचा बजाज ऑटोचा प्रयत्न आहे.  पुणे आणि बेंगळुरूनंतर चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणारं नागपूर तिसरं शहर ठरलं होतं. आता नागपूरनंतर कंपनी आपली चेतक इलेक्ट्रिक स्कूटर औरंगाबादमध्ये उतरवणार आहे.

 स्कूटरची ऑन-रोड आणि एक्स-शोरुम किंमत आणि खासियत काय –

औरंगाबादमधील ग्राहक कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन (www.chetak.com) ,००० रुपये टोकन अमाउंट भरून या स्कूटरसाठी बुकिंग करू शकतात.

 जोरात टक्कर -

पुढील वर्षापर्यंत अर्थात २०२२ पर्यंत २२ शहरांमध्ये चेतकची विक्री सुरू करण्याची बजाज ऑटोची योजना आहे. पुढील काही महिन्यात चेन्नई आणि हैदराबादमध्येही चेतक इलेक्ट्रिकची विक्री सुरू होईल. भारतीय बाजारात बजाज चेतक इलेक्ट्रिकची टक्कर टीवीएस आयक्यूब, एथर 450X आणि अन्य प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरसोबतच आगामी ओला ई-स्कूटरशीही असेल. ओला इलेक्ट्रिक स्कूटरलाही ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून बुकिंग सुरू झाल्यानंतर फक्त २४ तासातच १ लाखापेक्षा जास्त जणांनी बुकिंग केली आहे.

 २ व्हेरिअंट-

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर शानदार लूक असलेली स्टायलिश स्कूटर आहे. चेतक ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असून गेल्या वर्षी कंपनीने ही स्कूटर लाँच केली होती. Urbanite  ब्रँड अंतर्गत चेतक स्कूटर कंपनीने आणली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर चेतक दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यात एंट्री-लेवल अर्बन (Urbane) व्हेरिअंट आणि प्रीमियम (Premium) या टॉप व्हेरिअंटचा समावेश होतो. रेट्रो-मॉडर्न लुकमुळे Bajaj Chetak Electric ही स्कूटर अत्यंत प्रीमियम दिसते.

बॅटरी-स्पिड-
या ई-स्कूटरमध्ये एक ३.८kW पॉवर आणि ४.१ kW पीक पॉवर इलेक्ट्रिक मोटर आहे. स्कूटरमध्ये दिलेल्या खास ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे रिअर व्हील्सलाही पॉवर मिळते. चेतक ई-स्कूटरमध्ये 3kWh लिथियम-आयन बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर इको मोडमध्ये ९५ किलोमीटर आणि स्पोर्ट मोडमध्ये ८५ किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी जवळपास ५ तासांचा वेळ लागतो, तर फास्ट चार्जिंग सिस्टिमद्वारे स्कूटरची बॅटरी फक्त १ तासात २५ टक्के चार्ज होते. चेतकमध्ये दिलेल्या बॅटरीची लाइफ जवळपास ७० हजार किलोमीटर आहे असा दावा कंपनीने केला आहे. या बॅटरीवर कंपनीकडून ग्राहकांना तीन वर्षे किंवा ५० हजार किलोमीटरची वॉरंटी दिली जात आहे. पण ही वॉरंटी स्कूटरच्या कमर्शियल वापर केल्यास लागू होत नाही. चेतक इलेक्ट्रिकच्या ३ फ्री सर्व्हिसही कंपनीकडून मिळतील.

 फिचर्स-

चेतकमध्ये मोनोशॉक सस्पेंशन असून दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक आहेत. मल्टी स्पोक अॅलॉय व्हीलसह ट्यूबलेस टायर असलेल्या या स्कूटरच्या पुढील बाजूला कंपनीने राउंड शेप हेडलाइट दिले आहेत. या स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, की-लेस इग्निशन, पुढील बाजूला हेडलँप्सजवळ ओव्हल LED स्ट्रिप यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत. चेतक इलेक्ट्रिक (Chetak Electric ) स्कूटर बनवण्यासाठी सॉलिड स्टील फ्रेम आणि हार्ड शीट मेटल बॉडीचा वापर करण्यात आला आहे.

 किंमत-

बजाज चेतक अर्बन व्हेरिअंटची एक्स-शोरुम पुणे किंमत १,४२,९८८ रुपये आणि टॉप प्रीमियम व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत १,४४,९८७ रुपये आहे. गेल्या आठवड्यात नागपूरमध्येही चेतक याच किंमतीत कंपनीने लाँच केली. त्यामुळे औरंगाबादमध्येही बजाज चेतकची किंमत इतकीच असण्याची शक्यता आहे. चेतकच्या दोन्ही व्हेरिअंटची ऑन-रोड किंमत अनुक्रमे १,४९,६७२ रुपये आणि १,५१,६८० रुपये असू शकते. याशिवाय महाराष्ट्र सरकारने अलिकडेच जारी केलेल्या सब्सिडीचाही लाभ ग्राहकांना मिळेल, पण त्याबाबत अजून बजाजकडून माहिती देण्यात आलेली नाही. (फोटो सौजन्य- बजाज चेतक इलेक्ट्रिक सोशल मीडिया अकाउंट)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या