Ticker

6/Breaking/ticker-posts

जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा

 

*जिओचे वर्षभर चालणारे खास दोन प्लान

*फक्त २ रुपये जास्त देवून दुप्पट डेटा मिळवा

*प्लानमध्ये वर्षभराची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंग
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्लीः रिलायन्स जिओ कडे वर्षभराची वैधता असलेले अनेक प्लान आहेत. जर तुम्हाला वारंवार रिचार्ज पासून सुटका हवी असेल तसेच वर्षभराची वैधता हवी असेल तर अशा प्लानची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. Jio  च्या वर्षभराची वैधता असलेल्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला महिन्याचा खर्च फक्त २०० रुपये येतो. आम्ही तुम्हाला अशा दोन प्लानची माहिती देतो. ज्यात फक्त २ रुपये जास्त खर्च करून दुप्पट डेटा मिळवता येवू शकतो. जाणून घ्या डिटेल्स.


रिलायन्स जिओचा २३९७ रुपयांचा प्लान, ३६५ जीबी डेटा
रिलायन्स जिओचा एक वर्षाचा प्लानची किंमत २३९७ रुपये आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण ३६५ जीबी डेटा मिळतो. ३६५ जीबी डेटा मध्ये तुम्ही कितीही डेटाचा वापर करू शकता. रोजच्या खर्च करण्यासाठी कोणतीही लिमिट नाही. प्लानमध्ये नेटवर्क वर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

जिओचा २३९९ रुपयांचा प्लान, ७३० जीबी डेटा
रिलायन्स जिओच्या २३९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच तुम्हाला ७३० जीबी डेटा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओच्या २३९७ रुपयांच्या प्लानच्या तुलनेत २३९९ रुपयांच्या प्लानमध्ये फक्त २ रुपयांचा फरक आहे. २ रुपये जास्त देऊन दुप्पट डेटा मिळवता येवू शकतो. २३९७ रुपयांच्या प्लानमध्ये ३६५ जीबी डेटा मिळतो तर २३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ७३० जीबी डेटा मिळतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या