*बिझनेसमन राज कुंद्राच्या अडचणीत होतेय दिवसेंदिवस वाढ
*आगामी काळात कोट्यवधीच्या
किंमतीत विकले जाणार होते पॉर्न व्हिडिओ, पोलिसांचा दावा
*राज कुंद्राच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून झालेत धक्कादायक खुलासे
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या
व्यवहाराची सर्व तयार झाली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत मुंबई पोलिसांनी
याचा खुलासा केला. एवढंच नाही तर पॉर्न फिल्ममधून होत असलेल्या कमाईचा वापर राज
कुंद्रा ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये करत असे असा संशयही पोलिसांना आहे. दरम्यान
न्यायालयानं राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, न्यायालयात सुनावणीच्या वेळी मुंबई
पोलिसांनी सांगितलं, 'राज कुंद्राच्या व्हॉट्सअॅप चॅट्सटी
तपासणी करत असताना, तो १२१ व्हिडिओंचा मोठा व्यवहार करणार
होता अशी माहिती समोर आली आहे. या व्यवहारात १.२ मिलियन डॉलरची रक्कम ठरवण्यात आली
होती. हा व्यवहार आंतरराष्ट्रीय बाजारासाठी होत होती असा अंदाज आहे.' १९ जुलैला झालेल्या अटकेनंतर राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थॉर्पे
यांना २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पण पोलिसांच्या तपासासाठी आता ही
कोठडी २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी
न्यायालयीन सुनावणीत, राज कुंद्रा पॉर्न फिल्म्समधून होणारी कमाई ऑनलाइन सट्टेबाजीसाठी वापरत
होता असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान राज कुंद्रा, रायन
थॉर्पे, आनंद बख्शी आणि इतर सहकारी 'हॉटशॉट्स'
अॅपसंदर्भातील सर्व संभाषण व्हॉट्सअॅप ग्रुपवरच करत असत असं पोलीस
तपासात उघड झालं आहे. पण या प्रकरणी अटक होऊ शकते याची कल्पना आल्यानंतर रायन
थॉर्पे याच्या सांगण्यावरून सर्व डेटा डिलिट केला गेला.
0 टिप्पण्या