Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ‘क्लस्टर’ची कामे आदर्शवत करा – खा. डॉ. सुजय विखे पाटील

 






लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 तिसगाव:- केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून शहरी चेहरा-मोहरा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे.  भारतामध्ये काही मोजक्या लोकसभा मतदारसंघात दोन पेक्षा जास्त क्लस्टर देण्यात आले. त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा समावेश असून  तीन क्लस्टर देण्यात आले आहेत. शासकीय यंत्रणेच्या उडसिंतेमुळे ही कामे रखडली होती, मात्र केलेल्या पाठपुराव्यामुळे व योजनांची सविस्तर माहिती प्रशासनाला दिल्यानंतर गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून  क्लस्टरची ही कामे आदर्शवत करा, असे आदेश खा. सुजय विखे पाटील यांनी दिले .

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे क्लस्टर अंतर्गत केंद्र सरकारच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळेमाजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, तिसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच काशिनाथ पा. लवांडे, ग्रामपंचायत सदस्य ,जिल्हा परिषद ब्लॉक डेव्हलपमेंट गटविकास अधिकारी श्रीमती झेंडे तसेच कासार पिंपळगाव, मढी , निवडूंगे, शिरापुर, गेवराई, कवडगाव, उमरखेड, तिसगाव,करंजी  आदि गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदि उपस्थित होते.

 

खा.विखे  पा. ते पुढे म्हणाले की ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मध्ये या योजनेची  सुरुवात करण्यात आली होती. या प्रत्येकी क्लस्टर साठी 15 कोटी याप्रमाणे 45 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र अतिशय चांगल्या योजनेबाबत प्रशासकीय दिरंगाई व योजनेचे अर्धवट माहिती मुळे प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आले नव्हते. वर्क ऑर्डर  न देण्यात आल्याने कामाची सुरुवातच झाली नव्हती. ,रुरबन योजनेमध्ये येणारे अडथळे लवकरात लवकर दूर करून त्यासंबंधीच्या प्रशासकीय मान्यता घेऊन काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे .  सर्व क्लस्टर मधील विविध योजनांचे भूमिपूजन केंद्रीय कृषिमंत्री केंद्रीय कृषी तथा ग्रामविकास मंत्री तोमर  यांच्या हस्ते येत्या 12 जुलै दुपारी 11,30 वाजता करण्याचे होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या