Ticker

6/Breaking/ticker-posts

मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत; रोहित पवारांनी यूजीसीला फटकारलं

 







लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

नगरः 'लोकांनी भरलेल्या 'टॅक्स'मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाहीत तर कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे. पण मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची यूजीसी ची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल,' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फटकारलं आहे.

करोना प्रतिबंधक लसीकरणाची जबाबदारी २१ जूनपासून पुन्हा केंद्र सरकारनं घेतली आहे. गेल्या आठवड्यातच पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली होती. देशातील सर्व नागरिकांना ही लस मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणाही त्यांनी त्यावेळीच केली. त्यानुसार आता काम सुरू झालं आहे. या दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीनं एक परिपत्रक काढलं आहे. यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी काढलेल्या परिपत्रकात मोफत लसीकरणासंबंधी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानणारे फलक शैक्षणिक संस्थांमधून लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं विविध भाषांमधील हे फलक तयार करून दिले असून ते देशातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, तंत्र शिक्षण संस्था यांनी आपल्या परिसरात लावावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून टीका सुरू झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियातून या निर्णयावर टीका केली आहे, तर काहींनी हा यात काही गैर नसल्याचंही म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनीही ट्विट करीत या निर्णयावर टीका केली आहे.


यूजीसीचा हा निर्णय मोदी यांना कदाचित माहिती नसावा असे सांगून पवार यांनी म्हटले आहे, 'मोदींना खूष करण्यासाठी शिक्षण विभागाच्या मंत्र्यांच्या सूचनेनुसार यूजीसीनं हा निर्णय घेतला असावा. आपल्या फायद्यासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकारणात ओढणं चुकीचं आहे. करोना आणि विद्यार्थी यांच्याबाबत तरी असं राजकारण करु नये,' असेही पवार यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या