Ticker

6/Breaking/ticker-posts

बेकायदा धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.. एकास अटक

 लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )बीड : उत्तर प्रदेशात बेकायदा धर्मांतरप्रकरणी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून,यातील इरफान ख्वाजा खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या वृत्ताने धक्का बसल्याची प्रतिक्रिया इरफानचे काका खुदबुद्दीन पठाण यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी कारवाई करून तिघांना अटक केली होती. त्यात इरफानचा समावेश आहे. इरफान हा मूळचा सिरसाळा(ता. परळी, जि. बीड) येथील रहिवासी आहे. काही काळापासून तो दिल्लीतच वास्तव्यास असल्याने गावाशी त्याचा फारसा संपर्क नाही. इरफान हा केंद्रीय बालकल्याण मंत्रालयात कामाला होता. सांकेतिक भाषा त्याला अवगत होती. मूकबधिर मुलांचे धर्मांतर करण्यासाठी इरफान या भाषेचा वापर करीत असल्याचा आरोप एटीएसने केला आहे.

सिरसाळा येथेच त्याचे बालपण गेले असून, त्याला वडील नाहीत. तीन भावांपैकी दोघे गावात व एक परळीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. इरफान हा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या