Ticker

6/Breaking/ticker-posts

राष्ट्रीय पाठशाळेत कॉ. आबासाहेब काकडे यांची जयंती साजरी

कॉ. आबासाहेब काकडे यांना जयंती एन.एन. सत्ता कॉलेज ऑफ फार्मसी, नारायणा इन्स्टिट्युट, अंश एडुकेयर ,राष्ट्रीय पाठशाळेत  अभिवादन.


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

अहमदनगर - कॉ.आबासाहेब काकडे यांनी गोरगरीब विदयार्थीसाठी वसतिगृहे व शाळा स्थापन करुन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले  सिंचनाच्या योजना व शिक्षणविषयक आबासाहेबांचे काम  भावी पिढ्यांसाठी मोलाचे व पथदर्शक ठरले असल्याचे प्रतिपादन  कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ बोडखे  यानी केले. 

 शहरातील स्टेशन रोड येथिल राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल व आनंद धाम रोड येथील बँक ऑफ इंडिया समोरील एन.एन. सत्ता कॉलेज ऑफ फार्मसी, नारायणा इन्स्टिट्युट, अंश एडुकेयर येथे कॉ आबासाहेब काकडे यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले . 

यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विशाल पांडे, फार्मसी कॉलेज चे प्रमुख विकास गवळी राष्ट्रीय पाठशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे,अंश एडुकेयर  चे प्रमुख प्राध्यापक कैलास पोटे , नारायणा इन्स्टिट्यूटचे  प्रमुख गणेश धोंडे सर्व मान्यवरांच्या  हस्ते कॉ.आबासाहेब काकडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

 यावेळी एन एन सत्ता कॉलेज फार्मसीचे प्राचार्य विशाल पांडे यांनी स्वःआबासाहेब काकडे यांच्या कार्याची माहिती दिली. देऊन म्हणाले की या कोवीडच्या कालखंडामध्ये फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण चालू आहे . यावेळी कैलासजी पोटे यांनी कॉ . आबासाहेब  काकडे यांच्या शौक्षणिक व सामाजिक कार्याविषयी माहिती दिली  कार्यक्रमासाठी इंडियन सत्ता फार्मसी कॉलेज चे सर्व कर्मचारी व राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलचे सर्व शिक्षक जनशक्ती जुनियर कॉलेज चे व नारायणा इन्स्टिट्यूट सर्व कर्मचारी उपस्थित होतेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या