Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाची उद्योग विश्वावर दहशत; दुसऱ्या लाटेने ७५ लाख नोकऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : करोना संकटाने पुन्हा एकदा कामगार वर्गाच्या मनात धडकी निर्माण केली आहे. देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना लॉकडाउनचे संकट गडद बनू लागले आहे. राज्यांच्या पातळीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे यापूर्वीच छोट्या मोठ्या उद्योगांना फटका बसला आहे. यातील लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) ताज्या अहवालात बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात तब्बल ७५ लाख बेरोजगार झाले असल्याचे 'सीएमआयई' ने म्हटलं आहे.


करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहा:कार उडवला आहे. आरोग्य यंत्रणेची पुरती दमछाक झाली आहे. येणार काळ रोजगार संधीच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे, असे मत सीएमआयईईचे संचालक महेश व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की स्थानिक पातळीवरील कठोर लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात ७५ लाख बेरोजगार झाले. यामुळे या महिन्यात बेरोजगारीचा दर ८ टक्क्यांसमीप गेला आहे. मागील चार महिन्यातील बेरोजगारीचा हा उच्चांकी दर आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय बेरोजगारी दर ७.९७ टक्के झाला आहे. शहरी भागातील बेरोजगारी दर ७.१३ टक्के आहे. तर ग्रामीण भागात बेरोजगारी दर ७.१३ टक्के आहे. यापूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय बेरोजगारी दर ६.५० टक्के होता.


करोनाच्या साथीचे कधी निर्मूलन होईल याची आपल्याला माहिती नाही मात्र बेरोजगारीचे संकट मात्र आणखी काही महिने कायम राहील, असे व्यास यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्या लॉकडाउनच्या तुलनेत अजूनही बेरोजगारीची स्थिती तितकी गंभीर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी देशात बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांवर गेला होता. कोट्यवधी कामगारांना लॉकडाउनमुळे नोकरी गमवावी लागली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या