Ticker

6/Breaking/ticker-posts

पंढरपुर पोटनिवडणूक : भाजपच्या अचूक रणनितीचा विजय



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

-पंढरपुर विधान सभा पोट निवडणुक -

 * निकालाचा अन्वयार्थ*

महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी सरकार च्या कामगीरीवर ही एक प्रकारचे भाष्य पंढरपुर च्या मतदारांनी नोंदवले आहे. महाविकास आघाडी चे ऊमेद्वार श्री भगिरथ भालके राष्ट्रवादी + शिवसेना + कांग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार होते. त्याच बरोबर सहानुभूती हा घटक ही सकारात्मक दृष्टीने महत्वाचा होता, कारण भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवडणूक होती आणि सहानुभूती फॅक्टरचा विचार करून पवारांनी भगिरथ यांना संधी दिली होती, राज्यात सत्तेत असलेले तीन मोठे पक्ष आणि अधिक सहानुभूती अशा चौघांविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी समाधान अवताडे यांना मैदानात उतरविले होते.

 २०१५ च्या विधान सभा निवडणुकीत अवताडे हे शिवसेनेचे ऊमेद्वार होते, व ४० हजार मते मिळाली होती, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढूनही ५४ हजार मते  अवताडे यांना मिळाली होती हे लक्षात घेऊन मा देवेंद्र फडणवीस यांनी समाधान अवताडे यांना ऊमेद्वारी दिली. देवेंद्रजी यांनी यशस्वी डाव टाकला व 

पंढरपूरच्या राजकारणातील दिग्गज असे घराणे मा आ प्रशांत परिचारक व मंगळवेढ्यात दबादबा असेलेले माजी ऊपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना बरोबर घऊन या पोटनिवडनुकिचे महत्व अधोरेखीत केले.

 अवताडे-परिचारक-मोहिते पाटील यांना बरोबर घेऊन देवेंद्रजी यांनी राष्ट्रवादीचा हिशेब चुकता केला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होणे हा पवार काका-पुतण्यांना व महाविकास आघाडी सरकार ला मोठाच धक्का दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले तरी आपण जिंकू शकतो असा विश्वास या निकालाने भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळाला आहे.

 त्याच बरोबर शिवसेनेची वोटबँक भालके यांच्या बरोबर राहिली नाही कमळ सोडुन घड्याळास मतदान करणे शिवसेनेच्या मतदारास रुचले नाही, हा मतदार भाजपा बरोबरच राहिला असे दिसत आहे.  राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबद्दलची नाराजी लोकांनी या निकालाच्या निमित्ताने व्यक्त केली.

 १) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश,

 २) लॉकडाऊनबाबतची धरसोड, 

३) अडचणीत असलेल्या शेतकर्यांचे वीज बिल थकबाकीपोटी कनेक्शन कापणे,

४) शेतकर्यांची अधुरी कर्ज माफी ,

         या व अशा अनेक कारणा मुळे जनतेच्या त मनात असलेला राग निकालातून बाहेर पडला आहे.

-------

 


- प्रा.भानुदास बेरड

*माजी जिल्हाध्यक्ष -भाजपाअहमदनगर जिल्हा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या