Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रतिक आंधळे एमबीबीएस परिक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचेमार्फत घेण्यात आलेल्या एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेत शेवगाव येथील  चि.प्रतिक महेंद्र आंधळे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. ते पाथर्डी पंचायत समितीचे कार्यालय अधीक्षक महेंद्र आंधळे यांचे चिरंजीव आहेत.

        प्रतिक आंधळे यांचे माध्यमिक शिक्षण शेवगावच्या आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालयात तर, उच्च माध्यमिक शिक्षण रेसिडेन्शिअल उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. 

      इयत्ता बारावीनंतर त्यांनी मुंबई येथील सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात (केईएम हास्पिटल) गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळवला आणि एमबीबीएसचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. प्रतिक आंधळे यांनी प्राप्त केलेल्या उज्वल यशाबद्दल त्यांचे शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या