Ticker

6/Breaking/ticker-posts

शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना धनादेशाचे वाटप

 

शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना धनादेशाचे वाटप करताना विस्ताराधिकारी चंद्रकांत सोनार, माजी सभापती प्रवीण कोकाटे आदी...(छाया : सोहेल मनियार)


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 चिचोंडी पाटील :  नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील ऋतुजा अमोल कोकाटे, तुषार राजेंद्र पवार,संस्कृती संदीप पवार या शेततळ्यात बुडून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

जिल्हा परिषद अहमदनगर व नगर तालुका पंचायत समिती यांच्या वतीने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार,माजी सभापती प्रवीण कोकाटे,स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राठोड सर यांच्या हस्ते राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत प्रत्येकी ७५ हजार रुपयांच्या धनादेशाचे विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटप करण्यात आले.

गेल्यावर्षी १० जुलै २०२१ रोजी चिचोंडी पाटील गावच्या पवार पट्टा म्हणून ओळखले जाणारे शिवारात  शेततळ्यात बुडून चुलत बहीण भावाचा मृत्यू झाला होता.चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र रघु पवार यांचा शाळेत शिकणारा तेरा वर्षांचा मुलगा तुषार राजेंद्र पवार तसेच संदीप रघु पवार उर्फ पैलवान यांची नऊ वर्षांची मुलगी संस्कृती या दोन्ही चुलत बहिण भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता.त्यापूर्वी चार महिन्यापूर्वी चिचोंडी पाटीलचे माजी सरपंच अमोल कोकाटे यांच्या मुलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत मृत पावलेल्या या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. 

याप्रसंगी माजी सरपंच तथा स्कूल कमिटी सदस्य दीपक चौधरी, महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मनियार सर, स्कूल कमिटी सदस्य लक्ष्मण हजारे,जि.प.प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर,राम कोकाटे सर,प्रशांत कांबळे, दादासाहेब पाचारणे सर, सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार,माजी सरपंच अमोल कोकाटे आदी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या