Ticker

6/Breaking/ticker-posts

वासुंदेकर ग्रामस्थांची मदत मी आयुष्यभर विसरणार नाही - आमदार निलेश लंके

शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत...!




आ . निलेश लंके यांच्या संकल्पनेतील शरच्चंद्र पवार कोविड सेंटरला ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ११ हजार १११ रूपयांची मदत सुपूर्त करताना आ . निलेश लंके यांच्यासह प्रांताधिकारी सुधाकर भोसले,भागुजी झावरे, पो.द.साळुंके, बबनराव गांगड,अमोल उगले,जालिंदर वाबळे,शरद झावरे,दादा भालेकर,संजय साळुंके,सुनिल टोपले,डाँ.उदय बर्वे,डाँ.बाबासाहेब गांगड,दत्ता साळुंके, रवि गांगड,अक्षय दाते,राहुल गायखे,दादा भालके यांच्यासह ग्रामस्थ  ( छाया - दादा भालेकर)


 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )



पारनेर:दिवंगत आमदार वसंतराव झावरे यांच्या विचारांचा वारसा वासुंदे गावाला असून ग्रामस्थांनी मतदाना बरोबर आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे त्यांची ही मदत मी आयुष्यभर विसरणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी वासुंदेकरांना दिली. 

पारनेर तालुक्यातील वासुंदे गावातील ग्रामस्थांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस आधार चारीटेबल ट्रस्ट, समता मित्र मंडळ व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने भाळवणी येथील शरदचंद्र पवार महा कोव्हिड सेंटरला १ लाख ११ हजार १११ रूपयांची मदत आमदार निलेश लंके व प्रांत अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,पं.स.माजी सदस्य राजेंद्र चौधरी,उद्योजक सुरेशशेठ धुरपते,सरपंच राहुल झावरे, संदिप चौधरी,भागुजी झावरे,पो.द.साळुंके,बबनराव गांगड,अमोल उगले,जालिंदर वाबळे,शरद झावरे,दादा भालेकर,संजय साळुंके,सुनिल टोपले,डाँ.उदय बर्वे, डाँ.बाबासाहेब गांगड,दत्ता साळुंके,रवि गांगड,अक्षय दाते,राहुल गायखे,दादा भालके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात कर्जुले हर्या येथील कोव्हिड सेंटरमध्ये जवळपास चार ते पाच हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले‌. हे कोव्हीड सेंटर चालवण्यामध्ये वासुंदेकर ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे वासुंदे ग्रामस्थांचे व माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले असून त्यांना विसरणार नाही असा शब्दही आमदार निलेश लंके यांनी दिला आहे. 

यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की भाळवणी येथील आमदार निलेश लंके यांच्या कोव्हिड सेंटरमध्ये आजपर्यंत जवळपास २ हजार २०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . त्यामुळे या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या आरोग्याच्या सोयी सुविधा असो किंवा अन्नदान हे आदर्श असून आमदार निलेश लंके यांचा आदर्श राज्यातील इतर लोकप्रतिनिधीनी घ्यावा असे आवाहन  केले .माझ्या वीस ते पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात असा लोकप्रतिनिधी मी जनसेवा करताना कधी पाहिला नाही ,त्यामुळे आमदार निलेश लंके हे कोरोना काळातील आदर्श कोव्हिड योध्दा असल्याचे गौरवोद्गार  प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काढले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या