लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद: गेल्या
काही दिवसांपासून आजारी असलेल्या खुनाच्या प्रयत्नात आरोपी शेख शकील शेख आरेफ याला
घाटीत हर्सुल कारागृहाच्या पोलिसांनी उपचारासाठी आले होते. सोमवारी दुपारी एक
वाजेच्या सुमारास या आरोपीने वॉर्ड क्रमांक पाच येथून पळ काढला. या आरोपीचा शोध
पोलिस घेत आहे.
शेख शकील शेख आरेफ (२३, रा. पडेगाव) याला खुनाच्या प्रयत्नाच्या
आरोपात छावणी पोलिसांनी अटक केली होती. गेल्या दोन वर्षांपासून शेख शकील हा हर्सुल
कारागृहात कैदेत आहे. शेख शकील याच्या कानाखाली गाठ आली होती. या गाठेवर उपचार
व्हावे. यासाठी नियमित तपासणीसाठी शेख शकील याला सोमवारी (३ मे) घाटी रूग्णालयात
आणण्यात आले होते.
त्याच्यावर उपचार करण्यासाठी आवश्यक
कागदपत्रांची प्रक्रिया पुर्ण करण्याचे काम झाल्यानंतर त्याला वॉर्ड क्रमांक ५
येथे नेण्यात येत होते. ही प्रक्रिया सुरू असताना, पोलिस कर्मचारी एस. एस. पवार यांच्या हाताला झटका देऊन शेख
शकील याने पळ काढला. या कैद्याचा पोलिसांनी बऱ्याच अंतरापर्यंत पाठलाग केला.
शेख शकील हा छावणी मार्गे पळाला असल्याची
माहिती पोलिसांना मिळाली. तुरूंग अधिकारी आणि पोलिस कर्मचारी हे पसार झालेल्या
कैद्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी एस.एस. पवार यांच्या फिर्यादीवरून शेख शकील
याच्या विरोधात बेगमपुरा पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या