Ticker

6/Breaking/ticker-posts

केडगांव ते अरणगांव या ग्स्त्याच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ . जगताप

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

अहमदनगर  :अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील केडगांव ते अरणगांव या ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली .

केडगाव ते अरणगांव हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून निधी अभावी प्रलंबित होते. त्याअनुषंगाने ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठवूराव करुन या ग्रामीण रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती .

ग्रामविकास विभागाकडून 1 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला. त्यामुळे लवकरच या कामाचे अंदापत्रक तयार करुन तातडीने निविदा प्रक्रिया प्रसिध्द करुन सदर कामाची प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार आहे.

केडगाव ते अरणगाव या ग्रामिण रस्त्याच्या कामामुळे दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व असून, यामुळे शहरातील रस्त्यांचे जाळे अधिक बळकट होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या