Ticker

6/Breaking/ticker-posts

PF-UAN नंबर माहीत नाही, घाबरू नका, अशा पद्धतीनं काढता येणार पीएफ खात्यातून पैसे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी UAN नंबर आवश्यक असतो, परंतु आपल्याकडे कोणत्याही कारणास्तव UAN नंबर नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. सामान्यत: लोकांचा असा विचार आहे की, यूएएन क्रमांकाशिवाय भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढता येत नाहीत. विशेषत: ही समस्या त्यांना उद्भवते ज्यांनी पूर्वीची कंपनी सोडलीय आणि त्यांचा यूएएन नंबर सांगणारे तिकडे कोणीच नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सिस्टममध्ये आवश्यक बदल केलेत, जेणेकरून भविष्य निर्वाह निधी खातेधारक (PF Account Holder) युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) नसतानाही त्याच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकतात.

 

यूएएन ही 12 अंकी एक युनिक संख्या आहे

इतकेच नाही तर ते UAN शिवाय त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात.  EPFO  ग्राहकांना आता यूएएनशिवाय त्यांच्या पीएफ खात्यात किती रुपये आहेत हे समजू शकेल. यूएएन  ही 12 अंकी एक यूनिक संख्या आहे, जी कायमस्वरूपी ईपीएफओ ग्राहकांना दिली जाते. ईपीएफओ सदस्यांसाठी हा नंबर कधीही बदलत नाही आणि प्रत्येक वापरकर्त्याचा स्वतःचा यूएएन नंबर असतो. ईपीएफओने आपली प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी अलिकडच्या काळात अनेक तांत्रिक सुधारणा केल्यात. UAN शिवाय पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी ईपीएफओ ग्राहकांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या अधिकृत वेबसाईट www.epfindia.gov.in वर भेट द्यावी लागेल आणि काही सोप्या टप्प्यांचे पालन करावे लागेल. याद्वारे वापरकर्ते त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकतील.

असा आहे मार्ग?

*यूएएनशिवाय पीएफ शिल्लक तपासण्यासाठी प्रथम epfindia.gov.in वर जा आणि लॉगिन करा.
*यानंतर होम पेजवर दिलेल्या या Here to Know your EPF Balance लिंकवर क्लिक करा
*असे केल्यानंतर सिस्टम आपल्याला epfoservices.in/epfo/ कडे पुनर्निर्देशित करेल, जेथे आपल्याला Member Balance Information टॅबवर क्लिक करावे लागेल.
*यानंतर EPFO सदस्यांना त्यांचे राज्य निवडावे लागेल आणि त्यांच्या EPFO कार्यालयीन लिंकवर क्लिक करावे लागेल.
*तुम्हाला पीएफ खाते क्रमांक, नाव आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
*सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. हे पूर्ण होताच PF शिल्लक स्क्रीनवर दिसून येईल.

 

ही रक्कम काढणे सोपे

कोणताही ईपीएफओ ग्राहक निवृत्त झाल्यावर किंवा किमान 2 महिने बेरोजगार असतील तरच त्यांच्या पीएफ खात्यातून संपूर्ण पैसे काढू शकतात. त्याच वेळी 1 महिन्यासाठी बेरोजगार झाल्यास आपण एकूण पीएफ रकमेपैकी 75% रक्कम काढू शकता. यूएएनशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी ईपीएफओच्या ग्राहकांना पीएफ काढण्याचा फॉर्म भरावा लागेल आणि तो स्थानिक पीएफ कार्यालयात जमा करावा लागेल. सदस्यांना यासाठी ऑनलाईन आधार आधारित क्लेम फॉर्म किंवा आधार नसलेला क्लेम फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. हा फॉर्म भरून वापरकर्ते त्यांच्या पीएफ खात्यातून अंशतः किंवा पूर्ण पैसे काढू शकतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या