Ticker

6/Breaking/ticker-posts

LIC 'एलआयसी'ची विक्रमी कामगिरी; करोना संकटात मिळवला आजवरचा सर्वाधिक प्रीमियम

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 
नवी दिल्ली :
 भारतीय आयुर्विमा महामंडळाने कोव्हीड-१९ च्या संकटात विक्रमी कामगिरी केली आहे. एलआयसीने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १.८४ लाख कोटी रुपयांचा नवीन प्रीमियम मिळवला आहे. तर याच वर्षात १.३४ लाख कोटी दावपूर्तीसाठी खर्च केले आहेत

विमा बाजारपेठेत वर्चस्व असणाऱ्या एलआयसीची कामगिरी गेल्या आर्थिक वर्षात खुलली आहे. या वर्षात एलआयसीच्या विमा योजना घेणाऱ्यांची संख्या वाढली. विशेषतः मार्च महिन्यात एलआयसीचा विमा बाजारातील हिस्सा ८१ टक्क्यांवर गेला होता. तर संपूर्ण वर्षभरात एलआयसीचा हिस्सा ७४ टक्के होता.

सरत्या आर्थिक वर्षात एलआयसीने पहिल्या वर्षातील प्रीमियमपोटी ५६ हजार ४०६ कोटी मिळवले आहेत. तब्बल २ कोटी १० लाख पॉलिसींची विक्री करण्यात आली आहे. त्यापैकी ४६ लाख ७२ हजार पॉलिसी या मार्च महिन्यात विक्री करण्यात आल्या. मार्च २०२० च्या तुलनेत यात २९८.९२ टक्के वाढ झाली. तर एलआयसीच्या एकूण व्यवसायात १०.११ टक्के वाढ झाली आहे.

दरम्यान, नव्या व्यवसायात वाढ झाली असली तरी दुसऱ्या बाजूला एलआयसीच्या दाव्यांमध्ये मागील वर्षभरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एलआयसीने करोना संकट काळात २ कोटी १९ लाख दाव्यांची पूर्ती केली. यासाठी १. १७ लाख कोटी खर्च करण्यात आले असल्याचे एलआयसीने म्हटलं आहे. महामंडळाने ९.५९ लाख मृत्यू दाव्यांची पूर्तता केली असून त्यासाठी १८१३७.३४ कोटी खर्च केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या