Ticker

6/Breaking/ticker-posts

ऊसाच्या फडात सापडले बिबटयाचे २ बछडे.. तोडणी बंद , एकच खळबळ , अन् परिसरात घबराट !

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शिरूर : - ऊस तोडणी चालू असताना शिरूर तालुक्यातील कुरुळी गावात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कुरुळी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुरुळी गावालगतच असणाऱ्या ज्ञानेश्वर बोरकर यांच्या शेतात सध्या ऊस तोडणी चालू आहे.

ऊस तोडणी चालू असताना शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळले. त्यामुळे ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांनी उसाची तोडणी थांबवली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. वन विभागाने तातडीने दखल घेऊन परिसरात येऊन बछड्यांना ताब्यात घेतले. मात्र बछडे सापडल्याची माहिती समजताच बछडे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. सापडलेले बछडे अंदाजे एक ते दीड महिने वयाचे आहेत. 

बछड्यांच्या विरहाने बिबट्याची मादी सैरभैर होऊन हल्ला करू शकते त्यामुळे सापडलेली बछडे पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

कुरुळी परिसरातील आणि लगतच्या गावांनी योग्य ती काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असून याठिकाणी नर आणि मादीचा वावर असावा अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या