एकाच दिवशी ११८ नागरिकांचे लसीकरण ; आरोग्य विभाग व आ.निलेश लंके प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ४५ वर्ष वयोगटावरील जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी नगर तालुक्यातील चास प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आ. निलेश लंके प्रतिष्ठान, सारोळा कासार यांच्या संयुक्त विद्यमाने सारोळा कासार येथे मंगळवारी (दि.६) विशेष लसीकरण कँप घेण्यात आला. यामध्ये ११८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. उपकेंद्रस्तरावर आयोजित केला गेलेला हा जिल्ह्यातील पहिलाच कँप ठरला आहे.
शासनाने मार्च महिन्यापासून ६० वर्ष वयाच्या पुढील वृध्द आणि ४५ वर्ष वयोगटापुढील आजारी व्यक्ती यांच्यासाठी कोरोना लसीकरण सुरु केलेले आहे. १ एप्रिल पासून ४५ वर्ष वयोगटापुढील सर्वच नागरिकांचे लसीकरण सुरु केलेले आहे. सारोळा कासार येथील आ. निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी लोकवर्गणी करत सामाजिक भावनेतून चास आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोफत वाहन व्यवस्था केली होती. या उपक्रमात गावातील १५० नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी गावातच उपकेंद्र स्तरावर कँपचे आयोजन करण्याची मागणी उपसरपंच जयप्रकाश पाटील यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका पवार यांच्याकडे केली होती. ती मान्य करत त्यांनी ११८ लसीचे डोस उपलब्ध करून दिले. त्यानुसार मंगळवारी (दि.६) हा कँप पार पडला. या साठी आ. निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिक्षकनेते संजय धामणे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, संजय काळे, गोराभाऊ काळे, सोसायटीचे सर्व नवनिर्वाचित संचालक तसेच जनआरोग्य फौंडेशनचे योगिराज धामणे, राजमुद्रा इन्फोटेक चे पवन कडूस, शहाजान तांबोळी, सचिन कडूस, राजेंद्र कडूस, बाळासाहेब कडूस सुभाष धामणे आदींनी आरोग्य यंत्रणेला ऑनलाईन नावनोंदणी, लसीकरणासाठी आलेल्यांना अल्पोपहार यासाठी मदत केली.
चास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सारोळा कासार आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सुविधा धामणे, आरोग्यसेविका इंदुमती गोडसे, डॉ.राहुल धामणे, वर्षा धामणे यांच्यासह आशा सेविका यांनी या कोरोना लसीकरण कँप साठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या