Ticker

6/Breaking/ticker-posts

मनसेच्या दणक्याने पाथर्डी उपजिल्हा प्रशासन झाले सरळ

                                                                          आंदोलनानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरळीत ..लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी : पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असुन उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे लसीकरणासाठी अालेल्या नागरीकांना तासनतास ताटकळत ठेवुन लस दिली जात होती तर अनेक जेष्ठ नागरिकांना चार पाच तास रांगेत उभे राहून देखिल रुग्णालय कर्मचारी माघारी पाठवुन देत होते. 

 दरम्यान या सावळ्या गोंधळाची मनसेने तात्काळ दखल घेऊन आंदोलन केल्यानंतर रुग्णालय प्रशासन सुता सारखे सरळ झाले असून लसीकरण सुरळीत करण्यात आले .

याबाबत अधिक माहिती अशी .रुग्णालयाच्या या मुजोर प्रवृत्तीच्या बाबतीत अनेक महिला व जेष्ठ नागरिकांनी मनसेच्या पदाधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे,शहर सचिव संदीप काकडे यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली असता रुग्णालयामध्ये सुमारे दिडशेच्यावर महिला,जेष्ठ नागरिक लसीकरणासाठी चार पाच तास ताटकळत बसूनही त्यांना रुग्णालयामधील कर्मचारी लस न देता अक्षरश: हाकलुन देत होते,लसीकरणासाठी ताटकळत बसुन देखील लस मिळत नाही असे सांगण्यात अाल्यामुळे नागरीकांचाही त्रागा होत असतानाच रुग्णालयामधील सावळ्या गोंधळामुळे लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी असलेल्या एकमेव टेबलवरील कर्मचारी भांबावून गेलेला होता,सोशल डीस्टसींगचा तर पुरता फज्जा उडालेला होता,

ऊपजिल्हा रुग्णालयामध्ये हा सर्व गलथान प्रकार घडत असताना रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ अशोक कराळे मात्र या सर्व सावळ्या गोंधळाशी काहीही देणेघेणे नसल्याचे अविर्भावात स्वतः वातानुकूलित केबीन मध्ये निवांतपणे बसुन होते.हा प्रकार पाहुन संतापलेल्या मनसेच्या पदाधिकार्यांनी या रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ. अशोक कराळे यांना तातडीने केबीन बाहेर येवून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली असता उलटपक्षी डाॅ.डाॅ कराळे यांनीच मनसेच्या पदाधिकार्यांना पोलीसांच्या ताब्यात देण्याची धमकी दिली,याप्रकारने अधिक्षकांशी शाब्दिक चकमकीत संतापलेले मनसे पदाधिकारी जिरेसाळ व पालवे यांनी तेथेच अांदोलनाला सुरुवात केली त्याला लसीकरणासाठी उपस्थित नागरीकांनी साथ देत डाॅ कराळे यांच्यासहित सर्व रुग्णालय प्रशासनालाच फैलावर घेत त्यांचेवर प्रश्नांची सरबत्ती केली,

अधिक्षकांची मुजोरी पाहुन संतापलेल्या नागरिकांनीही "अाम्ही केंद्र व राज्य सरकारच्या अावाहनाला प्रतिसाद देत लस घेण्यास अालो हा जर गुन्हा असेल व यासाठी तुम्ही पोलीसांना बोलावून घेतले अाहेच तर अाम्हालाही अटक करा" अशी मागणी केली,मनसे पदाधिकारी व नागरीकांचा संताप पाहुन ऊपरती झालेल्या अधीक्षकांनी नंतर मात्र झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून सोमवार पासुन नोंदणीसाठी अतिरिक्त दोन संगणक व लसीकरणासाठी वाढीव कर्मचारी नियुक्ती करून सोमवापासुन अालेल्या प्रत्येक नागरीकांना तत्काळ लस दिली जाईल असे सांगितले .

यावर जिरेसाळ व पालवे यांनी लस घेण्यासाठी रुग्णालयात उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरीकांना जोपर्यंत लस दिली जाणार नाही तोपर्यंत जागेवरुन हलणार नाही असा पवित्रा घेतल्याने उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने लगेचच सकाळपासून ताटकळत बसलेल्या सुमारे शंभर नागरीकांचे अवघ्या तासाभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले या नंतर मनसेच्या वतीने सुरु असलेले अांदोलन थांबवण्यात अाले.

 रुग्णालय अधीक्षकांनी दिलेल्या अाश्वासनाप्रमाने सोमवार पासुन लसीकरण सुरळीत न केल्यास व रुग्णालयात दाखल कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांच्या ऊपचारात हलगर्जीपणा केल्यास उपजिल्हा रुग्णालयातील हलगर्जीपणा करणारे डाॅक्टर व कर्मचारी यांनाच रुग्णालयाच्या अात कोंडुन "रुग्णालयाला टाळेठोको अांदोलन" करण्यात येईल असा मनसेच्या वतीने ईशाराही देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या