Ticker

6/Breaking/ticker-posts

' काय तुझ मनात, सांग माझ कानात 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘या’ एका फोटोची देशाभर चर्चा..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी टीएमसी आणि भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे पश्चिम बंगाल निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केल्याची चर्चा आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण 24 परगणामधील सोनारपूर येथे एक जाहीर सभा घेतली. या सभेतील मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल

एक मुस्लिम बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काही तरी सांगत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. महत्त्वाचे म्हणजे हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर एका जफर सरेशवाला व्यक्तीनं आपल्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला असून, हा फोटो हजार शब्दांच्या किमतीचा असल्याचं त्याने लिहिलंय. पण ती व्यक्ती नेमकं मोदींच्या कानात काय सांगत असेल, याबद्दलही आता सोशल मीडियातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकांची ओळख त्यांच्या कपड्यांवरून होते, असं कोण बोललंय?. तुम्ही मुस्लिमांना वगळलेले सीएए विसरलात, असे दिसते, असा टोलाही एका युजर्सनं लगावलाय.

हर हर महादेवसुद्धा ऐकायला मिळेल

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दक्षिण 24 परगणामधील सोनारपूर येथे एक जाहीर सभेतून ममता बॅनर्जींवरही जोरदार हल्लाबोल केलाय. ममता बॅनर्जी यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याच्या मुद्द्याला हात घालत मोदींनी ममतांवर पलटवार केलाय. तिकडे तुम्हाला टिळे लावणारे मिळतील. शेंडी ठेवणार भेटतील. इथे तुम्ही जय श्री रामच्या घोषणेनं चिडता. तिथे तुम्हाला हर हर महादेवसुद्धा ऐकायला मिळतील. ममतांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय, परंतु ती त्यांची सर्वात मोठी चूक असल्याचंही सिद्ध झालंय. नंदीग्राममधून ममतादीदींचा पराभव होत असल्याचं दिसायला लागल्यानंतरच टीएमसीनं त्यांना दुसऱ्या जागेवरून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या