Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोनाचे थैमान, पर्यायच नाही ; राज्यात लागणार लॉकडाऊन ?

 



लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : -राज्यात कोरोना विषाणूचे सुरु झालेले महाकाय थैमान आटोक्यात येण्याचे कुठलेच चित्र दिसत नसल्याने जनतेमध्ये लॉकडाऊनचे भय पसरले आहे. लॉकडाऊन लागणार का? लॉकडाऊन कधी लागणार? लॉकडाऊन किती दिवसांचा असणार? अशी अनेक प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत. लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील.


वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यानच दिला होता. परंतु, कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील अत्यंत वरिष्ठ आणि विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं समजतं.

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय अटळ आहे. पण तो लागू कसा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, मीनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध या पर्यांयावर चर्चा होत आहे. नागरिकांचं अर्थचक्र न थांबता काही उपाय योजना करता येतील का ? कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने निर्बंध लावण्यात यावेत, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

फास आवळला; राज्यात रुग्णांची विक्रमी नोंद

राज्यात आज पुन्हा विक्रमी कोरोना बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आज तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. वाढत जाणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात येत्या दोन दिवसात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे. याआधीच पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

आज नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरले असून ते आता 84.49% झाले आहे.

कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या