Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रशासनाने तातडीने रेमडीसिव्हर व आक्सिजनचा पुरवठा करावा - मनसे

 मनसेचे शेवगांव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी 
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव - अहमदनगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यातील  कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत असून याबाबत प्रशासनाने तातडीने पावलं उचलावीत तसेच जिल्ह्यातील रूग्णांना तातडीने रेमडीसिव्हर व आक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेवगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. 

            याबाबत जिल्हाअधिका-यांना निवेदन देऊन त्यांनी मागणी केली कि जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात  कोरोनाची  भीषण व भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक रूग्णांना कोरोना वरिल औषधं, इंजेक्शन मिळत नाहीत तसेच बेड, व ऑक्सिजनचा  देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यावर तातडीने कार्यवाही करावी तसेच  शेवगाव तालुक्यातील कोरोना चाचणी केंद्र व लसीकरण केंद्र एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. तरी लसीकरण व चाचणी केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी करावेत तसेच शेवगाव शहरातील विविध ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात यावीत जेणेकरून शहरातील नागरिकांना सोईचे होईल व एकाच ठिकाणी होणा-या गर्दीस देखील आळा बसेल. तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत असे कोविड सेंटर उभारण्यात यावीत. तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील लसीकरण केंद्र सुरू करावीत लसीकरण केंद्रात रोज लसीकरण करण्यात यावे. यासह विविविध मागण्या करत तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी या निवेदनाच्या प्रती राज ठाकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या