Ticker

6/Breaking/ticker-posts

घुले बंधूंच्या प्रयत्नांतून शेवगाव येथे १०० बेडचे कोविड रूग्णालय सुरू

  *जि.प. अध्यक्षा राजश्री घुले यांचे हस्ते उद्घाटन

  *माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले बंधूंचा पुढाकार लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

  शेवगाव (जगन्नाथ गोसावी ) :-  कोरोना बाधितांची  वाढती संख्या व अपुर्‍या आरोग्य सोई सुविधा यांचा ताळमेळ बसावा तसेच बाधित रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, या दृष्टीने माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून शेवगाव येथे १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. या कोवीड सेंटरचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परीषद अध्यक्षा ना.सौ.राजश्री घुले यांनी केले. 

       शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात  बुधवारी (दि.२१) कोविड सेंटरचे उद्घाटन सौ. घुले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी  जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. संदीप सांगळे, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, नायब तहसीलदार मयूर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी सलमा हिराणी, वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामेश्वर काटे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील,  शिक्षण विस्ताराधिकारी शैलेजा राऊळ, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. अनिल मडके,  युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, संचालक संजय फडके, ज्ञानेश्वरचे संचालक ज्येष्ठ काकासाहेब नरवडे, कमलेश लांडगे, वहाब शेख, समीर शेख, संतोष जाधव, अभिजीत आरेकर, डॉ.मेघा कांबळे आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

     शेवगाव शहरात शासकीय तीन, शहर व तालुक्यात खाजगी सात अशी एकूण १० कोविड सेंटर कार्यरत आहेत. मात्र, तालुक्यात कोवीड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून येथे १०० बेडचे सर्व सोयीयुक्त कोविड सेंटर सुरु आले आहे. रुग्णांची शारिरीक व मानसिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार, योगा, ध्यानधारणा आदी उपक्रमही येथे राबविण्यात येणार आहेत. रुग्ण संख्येत वाढ झाल्यास येथे बेडची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती सभापती डॉ.क्षितीज घुले यांनी दिली.

 या कोविड सेंटरमध्ये तालुका आरोग्य अधिकारी सलमा हिराणी यांच्या मार्गदर्शनाखाली डाँ. विकास बेडके, डाँ. अभय देशपांडे, डॉ.दिनेश राठी, डॉ.अमित फडके, डॉ.मनोज पाचारणे आदी रुग्णांवर उपचार करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या