Ticker

6/Breaking/ticker-posts

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतली करोना प्रतिबंधक लस

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 पारनेर:- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात येउन कोव्हीशिल्ड ही करोना प्रतिबंधक लस घेतली. ग्रामिण रूग्णालयाच्या परिचारीका एस. आर. शेळके यांनी हजारे यांना ही लस दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अभिलाशा शिंदे अण्णांचे सहकारी दिलीप देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. 

सकाळी ११ वाजण्याच्या सुुमारास हजारे ग्रामिण रूग्णालयात पोहचले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे तसेच डॉ. अभिलाशा शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर परिचारीका शेळके यांनी त्यांना लस दिली. लसीकरणानंतर दोन दिवस त्रास होण्याची शक्यता असल्याने अण्णांनी आराम करणे पसंत करावे अशी विनंती डॉ. लाळगे यांनी यावेळी केली. काही त्रास झालाच तर सोबत काही औषधेही देत असल्याचे लाळगे यांनी सांगितले. त्यावर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर नागरीकांच्या भेटी बंद करण्यात आल्या असल्याचे हजारे यांनी सांगितले. भेटी बंद असल्याने सध्या आपण आरामच करीत आहोत असेही ते म्हणाले. 

पंधरा दिवसांपूर्वीच लस घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. परंतू मणक्याचा आजार बळावल्यामुळे लसीकरणास विलंब झाल्याचेे अण्णा म्हणाले.

 करोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढतो आहे. नागरीकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. सध्या केवळ अत्यावष्यक सेवा सुरू आहेत. आवष्यकता असेल तरच नागरीकांनी घराबाहेर पडावे. करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून नागरीकांनी सहकार्य केले तरच त्यात यश येणार असल्याने नागरीकांनी आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबतही गैरसमाज करून न घेता नागरीकांना लसीकरणास प्रतिसाद देण्याचेही हजारे यांनी आवाहन केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या